ओझर तालुका जामनेर येथे मागील पंधरवड्यात वादळी पाऊस झाला त्या पावसामध्ये आपल्या तेली समाजातील अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. घरांची पडझड झाली शेतकऱ्यांचे पीकांचे व गुरेढोरे जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तेथील नुकसानग्रस्त शेतकर्यांची चर्चा करून त्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी खानदेश तेली समाज मंडळ प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने रविवार दिनांक २६ रोजी मंडळाचे सचिव रविंद्र जयराम चौधरी, तेली समाजाचे समाज सारथी मनोज मधुकर चौधरी, भाऊसाहेब दौलत नामदेव चौधरी, मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी,उपाध्यक्ष ललित रवींद्र चौधरी यांनी तेथील तेली समाजातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन तेथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करून स्वतंत्र अहवाल तयार केला. त्या अहवालाच्या आधारे शासनदरबारी शेतकऱ्यांसाठी न्याय मागून त्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.
यावेळी मंडळाच्या पदाधिकारी सह जामनेर पंचायत समितीचे सदस्य रमण तुकाराम चौधरी, सोसायटीचे चेअरमन संजय जगन्नाथ चौधरी, युवराज तुळशीराम चौधरी, अशोक नारायण चौधरी, खानदेश तेली समाज मंडळाचे जामनेर तालुका अध्यक्ष अजय अशोक चौधरी, सचिव विलास शालीकराम चौधरी, उपाध्यक्ष विशाल हरिश्चंद्र चौधरी, प्रसिद्धीप्रमुख सोपान नाना चौधरी व वझर गावातील अनेक ग्रामस्थ सहभागी होते.