कोकण स्नेही ट्रस्ट शिष्यवृत्ती
श्री. मधुसुदन गोपाळ तेली, गोरेगांव पुरस्कृत, १. कै. गोपाळ बाळा तेली, २. कै. सिताबाई गोपाळ तेली, ३. कै. बाळकृष्ण गोपाळ तेली ह्यांच्या स्मरणार्थ
४. श्रीमती मीनल प्रभाकर कांदळगांवकर पुरस्कृत कै. प्रभाकर रामचंद्र कांदळगांवकर हांच्या स्मरणार्थ
अर्जासंबंधी नियम १) सदर अर्जदर वर्षी दि. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत कोकण स्नेही ट्रस्टने जाहिर केलेल्या पत्त्यावर पोहोचेल याची काळजी घेणे ही अर्जदाराधी जबाबदारी राहील. २) अर्जासोबत खालील प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती अत्यावश्यक आहेत. अ) रहात असलेल्या स्थळाबाबत पुरावा. १) रेशनिंग कार्डाची प्रत २) इलेक्ट्रीक बिलाची प्रत व दहावी, बारावी व गेल्या शैक्षणिक वर्षात दिलेल्या परीक्षांच्या गुणपत्रकाच्या प्रमाणित प्रती. क) इतर मागासलेल्या जातीचा (OR.C.) त्याबदल तहसीलदार (कलेक्टर) किंवा तत्सम अधिकाऱ्याकडून मिळालेल्या जातीच्या दाखल्याची प्रमाणित प्रत व नॉन क्रिमी लेयर बाबतचे प्रमाण पत्र. ड) व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्यासंबंधीच्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत (बोनाफाईड सर्टिफिकेट) इ) पालकाच्या उत्पन्नाबाबत नोकरीत असल्यास कंपनी/संस्था/शासन यांच्याकडून किंवा व्यावसायिक असल्यास शासकीय दाखल्याची प्रमाणित प्रत. फ) आपणांस शिष्यवृत्ती आवश्यकता का आहे ? या विषयीचे विद्यार्थ्यांचे एका कोरया कागदावर थोडक्यात निवेदन. ग) आपल्या विभागातील एका प्रतिष्ठीत समाजबांध्याचे संदर्भपत्र / शिफारसपत्र अर्जा सोबत सादर करावे. ३) अर्जासोबत जोडलेली प्रमाणपत्रे, गुणपत्रके इ. च्या प्रती मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्रमुख अथवा राजपत्रित अधिकारी यांच्या सही शिक्यानिशी प्रमाणित केलेल्या असाव्यात. कोणत्याही प्रमाणपत्राच्या मूळ प्रती गुदाम मागणी केल्याशिवाय पाठवू नयेत, त्या गहाळ झाल्यास, त्यास कोकणस्नेही ट्रस्ट जबाबदार नसेल, बर उल्लेखलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती शिवाय अर्ज आल्यास तो अर्ज अपूर्ण समजला जाईलब तो छाननी करताना विचारात घेतला जाणार नाही. ४) अर्जातील माहितीच्या सत्यतेबाबत प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षरित्या चौकशी व फेरतपासणी करण्याचा अधिकार कोकण स्नेही ट्रस्टचा राहिल.आवश्यकता भासल्यास अर्जदाराकडून काही अधिक माहिती मागवली जाईल व ती अर्जदाराने त्वरीत दिली नाही तर, त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. ५) अर्ज मंजूर अथवा नामंजूर करण्याचा निर्णय हा सर्वस्वी कोकण स्नेही ट्रस्टला असेल व तो अंतिम राहील. त्याबद्दल कसलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही. ६) शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्याथ्यास त्यांच्या प्रत्येक सत्रात होणाऱ्या परीक्षेची गुणपत्रिकेची प्रमाणित प्रत त्वरीत कोकण स्नेही ट्रस्ट ला पाठविण्याची जबाबदारी स्वतः पार पाडावी लागेल. त्यानुसार त्याची शैक्षणिक प्रगती समाधानकारक न वाटल्यास शिष्यवृत्ती थानविण्याचा अथवा रद करण्याचा सर्वाधिकार कोकणस्नेही ट्रस्ट कडे राहिल व त्या बाबतीत कोकणस्नेही ट्रस्टचा निर्णय अंतिम असेल.७) ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न रुपये २० हजार पेक्षा कमी असेल अशा पालकांचे पाल्य गुणवत्तेनुसार य आवश्यकतेनुसार शिष्यवृत्तीस पात्र ठरतील. ८) ही शिष्यवृत्ती फक्त होतकर व गरजु ३ विद्यार्थ्याना प्रत्येकी रु.७०००/- प्रमाणे देण्यात येईल. शिष्यवृत्तीच्या अर्जासंबंधीच्या पत्रव्यवहाराचा पत्ता :श्री. श्रीकृष्ण तळावडेकर, चिटणीस, फाॅल्ट नं.३२, पद्मावती सोसायटी, पदमावती देवी मार्ग, आय. आय. टी. मार्केट, पवई, मुंबई ४०० 006 फोन : 25760108, मो. 9869263759