खान्देश तेली समाज मंडळ धुळे शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार, दि. ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आय. एम. ए. हॉल, क्युमाइन क्लब च्या समोर, जेल रोड, धुळे या ठिकाणी आयोजित केलेला असून त्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
धुळे शहर व तालुका, साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील संपूर्ण जिल्हाभरातून बरेच विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेली असून नाव नोंदणीची मुदत २६ सप्टेंबर अशी आहे. अजूनही धुळे जिल्ह्यातील तेली समाजातील ज्या गुणवंत मुला-मुलींना आपले नाव नोंदणी करायची असेल त्यांनी खान्देश तेली समाज मंडळाचे धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी ७९७२२०८८२९ , सचिव राकेश पुंडलिक चौधरी ९९२३३३२५३१ , कार्याध्यक्ष अमोल हिरामण चौधरी ९४०३४९२५५८, उपाध्यक्ष ललित रवींद्र चौधरी ७४४८०७८९४१ यांच्या मोबाईलवर आपले मार्कशीट नाव पत्त्या सहित पाठवून सहकार्य करावे असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.
तेली समाजातील दहावी व बारावी इयत्ता मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असतील अशाच विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करायची असून, ज्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली त्यांना कार्यक्रमास उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. जे विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत त्यांचा सत्कार होणार नाही असेही मंडळाने कळविले आहे.
धुळे जिल्ह्यातील तेली समाजातील विद्यार्थी व पालकांनी आपली नाव नोंदणी करून मंडळास सहकार्य करावे व सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रविंद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, महिला आघाडी अध्यक्ष सौ. मालतीताई सुनील चौधरी, सचिव सौ.सविताताई प्रताप चौधरी, कार्याध्यक्ष सौ. शुभांगी मुकेश चौधरी व सर्व खान्देशातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.