ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी व ओबीसी समाजांचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे या मागण्यांसाठी आज खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. श्री नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले. आज धुळे जिल्हा दौऱ्यावर असतांना त्यांची मंडळाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. आपल्या पक्षाच्या वतीने प्रयत्न करून समस्या सोडवून ओबीसी समाजाला न्याय देण्याची विनंती करण्यात आली.यावेळी इतर सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी कॉग्रेस चे शहर अध्यक्ष मा.युवराज आबा करनकाळ यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रविंद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade