नवरात्र तसेच दिवाळीमुळे घरोघरी खाद्यतेलाच्या मागणीमध्ये वाढ होते. यामुळे बाजारात पैकिंगच्या तेलासह घाण्याचे तेलही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. तळलेले पदार्थ तसेच गोड पदार्थ करण्यासाठी शक्यतो घाण्याचे तेल वापरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.
दिवाळीत गोडधोड पदार्थ बनविण्यासाठी घरोघरी तेलाचा वापर वाढतो. यातच तेलाचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध होतात. यामध्ये पकिंगच्या तेलाला घरोघरी पसंती दिलीजाते तर काही ठिकाणी घाण्याचे तेल वापरले जाते. मात्र, अनेकांना दरवाढीमुळे कोणते तेल घ्यावे ? असा प्रश्न पडतो. आयुर्वेदानुसार आहारातील पदार्थ बनविण्यासाठी व शरीरासाठी घाण्याचे तेल हे उपयुक्त असते, असा सल्ला काही आयुर्वेदिक तज्ञांशी संवाद साधला असता दिला आहे. तेल खरेदी करताना त्याची शुद्धता तपासणे गरजेचे आहे. याकडे अनेकजण फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आरोग्याचे प्रत उद्भवू शकतात.
तळण्यासाठी कोणते तेल वापरावे ?
तळलेले पदार्य करण्यासाठी शक्यतो घाण्याचे तेल वापरावे. ते न मिळाल्यास करडी, सूर्यफूल, सोयाबीन या तेलांना प्राधान्य द्यावे. वनस्पती किंवा डालडा तुप याचा वापर करु नये.
घाण्याचे तेल
- घाण्याचे तेल शक्यतो मोठ्या प्रमाणावर मिळत नाही. सगळीकडे हे तेल उपलब्ध होत नसल्याने विश्वासातील व्यक्तीकडून घाण्याचे तेल घेतल्यास ते वापरावे.
-घाण्याचे तेल चवीला चांगले असते तसेच शरीरासाठी पोष्टिक असून हे तेल वापरल्यास त्वचा टवटवीत होते व पचन व्यवस्था चांगली राहते.यासह हृदयाचे कार्यही सुरळीत चालते.
पॅकिंगचे तेल -
- पॅकिंगचे तेल वापरणे शक्यतो टाळले पाहिजे. कारण यामध्ये तेल चांगले राहण्यासाठी केमिकल प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात तसेच या तेलात ५५ ते ६० टक्के पामतेल आढळते.
- यामुळे वजन वाढणे, हाडे ठिसूळ होणे, केस गळणे, सांधेदुखी, अपचन यासह पोट विकार जडू शकतात. तसेच या तेलाला चव कमी असते.
- प्रत्येक वयोगटानुसार तेल किती वापरावे असे काही प्रमाण नाही. मात्र्, प्रत्येकाने कमीत कमी तेलाचा वापर असलेले पदार्थ खावेत. तळलेले पदार्थ शक्यतो खाऊ नयेत.
- गोड पदार्थ बनविण्यासाठी तेलापेक्षा गाईच्या तुपाचा वापर करावा व तिखट पदार्थासाठी सोयाबीनचे तेल वापरावे, असा सल्ला आहारतज्ञ डॉ. प्रशांत धमगुंडे यांनी दिला आहे.
अनेक तेलांमध्ये असते मिश्रण
- शेगदाणा तेल किंवा करडी तेल यामध्ये पूर्णपणे शेंगदाणावकरडी यांचा वापर नसतो. शेगदाण्यात काही प्रमाणात सोयाबीन तसेच पाम तेलाचे मिश्रण टाकले जाते तर करडीमध्ये सूर्यफूल तेल किंवा सरकी तेल टाकले जाते.