आज तेली समाजात सामाजिक व राजकिय जागृती दिसते त्याच्या मुळाशी तैलिक प्रबोधनकारांचे अथक प्रयत्न कारणीभुत आहेत. त्यांच्या कार्याचा फक्त परिचय करन घेणे एवढाच उद्देशय लेखाचा नाही, तर पदरमोड करन प्रसंगी आर्थिक झळ सोसुन त्यांनी सुरू ठेवलेल कार्य हे लाख मोलाचे होते, हे कार्य पोटार्थी नव्हते तर ती यज्ञात टाकतात तशी समिधा स्वरूपाची होती. नाही चिरा नाही पणती असे त्यांचे स्वरूप होते. त्यांच्या अतुलनिय कार्याची दखल घेऊन वंदन करणे हे प्रत्येक समाज बांधवाचे कर्तव्य आहे.
राज्यात तेली समाजात प्रबोधन व्हावे त्यासाठी मासिक असावे असा पहिला विचार करणारा प्रबोधनकार कोण ? याचा मी शोध घेण्यासाठी तेली गल्लीचे मोहन देशमाने यांना विचारले त्यांनी पुढील माहिती दिली.