खान्देश तेली समाज मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मंडळाचे मुख्य कार्यालयात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाज सारथी गिरीश गुलाबराव चौधरी होते. बैठकीला मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रविंद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, ज्येष्ठ मार्गदर्शक योगेंद्र नामदेवराव थोरात, धुळे शहर कार्याध्यक्ष अमोल हिरामण चौधरी, महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ.मालतीताई सुनील चौधरी, सचिव सौ. सविताताई प्रताप चौधरी,शहर उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी,शहर सचिव राकेश पुंडलिक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस उत्कृष्ट नियोजन करून विद्यार्थी गुणगौरव सोहळा, तेलघाणा प्रशिक्षण शिबिर व रोगनिदान शिबिर यशस्वीरित्या कार्यक्रम संपन्न केल्याबद्दल शहर कार्यकारणी चा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तद्नंतर पुणे येथील सामाजिक बांधिलकी मासिकाच्या वतीने आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक समाज सारथी श्री दौलत नामदेव चौधरी वरखेडे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचा गिरीश चौधरी, कैलास चौधरी, रवींद्र चौधरी व सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पुरस्कार जाहीर केल्याबद्दल सामाजिक बांधिलकी मासिकाचे संपादक दिलीप चौधरी व मंडळाचा आभाराचा ठराव देखील यावेळी करण्यात आला.
त्यानंतर वधू-वर परिचय मेळावा संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात येऊन परवानगी मिळाल्यास मेळावा अथवा पुस्तक प्रकाशन समारंभ घेण्याचे ठरवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लवकरच नियोजनार्थ संपूर्ण खान्देश व्यापी बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेतला. वधू-वर परिचय मेळाव्यासाठी अनेक उपवर मुला-मुलींची नोंदणी झालेली असून अद्याप ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांना आवाहन करण्याचे तसेच पुस्तिकेसाठी जाहिरातदारांना आव्हान करण्याचे ठरवण्यात आले.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली शेवटी मंडळाचे सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून बैठक समाप्त झाली.