विश्वनाथ चिंचकर :- हे मुळचे वाईचे ! यांनी 1922 मध्ये तेली समाचार पत्र काढले हे कार्य त्यांनी कै. रामचंद्र मेरूकर यांच्या प्रेरणेने केले. व तेली समाचार पत्र काढले. पश्चिम महाराष्ट्रातील तेली समाज बांधवांची 4 वेळा तेली समाजाची परिषद भरवली. समाजासाठी भरलेल्या या समाजसेवकाने पदरमोड करुन हे सर्व केले ! पुढे ते कर्जबाजारी झाले. व पुण्यात केसरी दैनिकात कंपोजिटर झाले दहा बाय दहाच्या खोलीत राहु लागले. पुढे त्यांचे निधन झाले शेवटच्या काळातही समाजाने त्यांची दखल घेतली नाही.