अकोला : तेली समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या तेल घाणा लघुउद्योग व्यवसायात समाविष्ट करून, नवीन पेटंट तयार करून तेल घाण्याला लघुउद्योगाचा दर्जा द्यावा. अशी मागणी तेली समाज समन्वय समितीने राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे मुंबई यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली. निवेदन देताना तेली समाज समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. प्रकाश डवले, राज्य सरचिटणीस प्रशांत शेवतकर, राज्य उपाध्यक्ष प्रा. वैशाली निवाने, अकोला जिल्हाध्यक्ष प्रा. श्वेता तायडे यांनी केली. यावेळी अकोला लोकसभा संपर्क नेत्या वैशालीताई घोरपडे, देवश्री ठाकरे आदी उपस्थित होते.