भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
रामकृष्ण राठोड :- हे अकोल्याहून प्रगति नावाचे 4 पानाचे मासिक काढत मला आठवते 1964 साली मी 7 वी परीक्षा म्हणजे तत्कालीन फायनल परिक्षा पास झालो. भारत सरकारचा शिक्का असलेले पहिले प्रमाणपत्र आम्हाला मिळाले, या यशाची बातमी प्रगतित छापुन आली. त्यामुळे आम्हाला खुप आनंद झाला. त्या काळात प्रगति मासिक अवघ्या दहा रूपयात वर्षभर मिळत असे 2 नये पैसे तिकीट लावुन ते भारतात कुठेही पाठविता येत असे. महाराष्ट्रात हे मासिक बर्याच ठिकाणी जात आहे. वर्गणीदार मिळविण्यासाठी रामकृष्ण राठोड महाराष्ट्रात दौराही करीत ! त्यांना पाहिल्यावर यशवंतराव चव्हाणांची आठवण येई ! तसाच पहराव ते घालत असत ! 4 पानांचे हे मासिक केव्हा येत ते मी केव्हा वाचतो असे होई राज्यातील तेली समाजाची माहिती देण्याबरोबरच राठोडांनीप्रगतिद्वारे केलेले प्रबोधन म्हणजे जागृतीची मशाल होती.