दि.14/11/2021 रोज रविवारला स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ, जळगाव जामोद येथे तेली समाज वधू - वर व पालक परिचय मेळावा समितीची कार्यकर्ता बैठक गणेशभाऊ गोतमारे (सोनाळा) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सर्वप्रथम समाजाचे दैवत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राजेंद्र आकोटकार यांनी पुस्तिका तयार करण्याचे सुचविले. रमेश आकोटकार यांनी ती बाब खर्चिक असून वेळ लागतो व पैसा मिळविणे कठिण जाते. थोटांगे सरांनी साधी पुस्तिका काढण्याचा मार्ग सुचविला. रोमील काथोटे व नितिन नवथळे या युवकांनी कमी खर्चात वेबसाईट बनवायचे काम स्विकारले. भागवत सरांनी स्टेज व्यवस्था सांगितली. नंदूभाऊ काथोटे यांनी प्रमूख मान्यवर कोण यावर चर्चा केली. सौ.मोनिका ऊमक यांना महिला व युवती यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवायचे ठरले. शरद खवणे यांनी सांस्कृतिक भवन मिळविण्याची जबाबदारी घेतली. शाम पांडव यांनी मागील जमाखर्च मांडून मंजूरात घेतली. फोन पे ने सुध्दा घेतली जाईल.प्रसिध्दीकरीता आपआपल्या गावात आपला फोटो टाकून सर्वांनी मेळाव्याची प्रसिध्दी करावी असे आकोटकार सरांनी सुचविले. कार्यक्रमात सर्वांना मत मांडण्याचे स्वातंञ्य होते .आलेल्या सुचनांवर विचार करण्यातआला.
सदर बैठकिला गणेश जामोदे,मुन्ना जामोदे,शाम पांडव , धोंडूजी काचकुरे, संजय पांडव,परेश निवाणे,गणेश अरूळकार,रमेश आकोटकार सर,दिलीपभाऊ आकोटकार,दशरथ अंबर्ते,नाजूक सुलताने,राजेंद्र आकोटकार,अनिल आकोटकार,दुर्गादास आकोटकार, गणेश गोतमारे,संजू चोपडे,मोहन कावरे,कैलास आकोटकार,प्रफूल्ल कावरे समाजबांधव हजर होते. सभेचे आभार अनिल धनभर सरांनी व्यक्त केले.सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला.