श्री.संताजी जयंती व संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त भव्य महिला भजन स्पर्धा (फक्त यवतमाळ शहरातील महिलांकरीता) रविवार दि. १२ डिसेंबर २०२१ ला, सकाळी १० वाजता स्थळ : संत गाडगेबाबा सभागृह, उज्वल नगर भाग-२, वडगांव, यवतमाळ प्रथम बक्षीस रोख रू. ७,००१ / श्री संताजी पतसंस्था, यवतमाळ यांच्या तर्फे द्वितीय बक्षीस रोख रू. ३,००१ / डॉ. दिपकभाऊ शिरभाते यांच्या तर्फे तृतीय बक्षीस रोख रू. २,००१/ स्मृतीशेष उज्वला दे. जिभकाटे यांचे स्मृती प्रित्यर्थ प्रोत्साहपर बक्षीस रोख रू. १,००१ / श्री. किशोरभाऊ थोटे यांचे तर्फे
भजन स्पर्धेचे नियम व अटी : १) नोंदणी फी रू. १५० /- राहील. २) एका गटात पाच भजनी महिलांना भाग घेता येईल.३) भजन मंडळात पाच महिलांचाच समावे असावा. ४) सादरीकरणाकरीता प्रत्येक मंडळास २० मि. वेळ देण्यात येईल. ५) भजन गातेवेळी तालावे व सुरांचे विशेष बंधन असावे. ६) भजन पूर्णपणे व्यवस्थीत पाठांतर असावे. शब्दांच्या उद्यारणाकडे विशेष लक्ष द्यावे. ७) भजन हे संताचे पद, विशेषतः संताजी महारजा, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, सावता माळी, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानदेव महाराज यांच्या विचारांवर आधारीत असावे, ८) भजन मंडळींनी लागणारे सर्व वाद्ये आपले सोबत आणावे. ९) परिक्षकाचा निर्णय हा अंतीम राहील. यामध्ये कोणताही वाद घालता येणार नाही. १०) सर्वांना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
जगतगुरू तुकोबारायांचे परमशिष्य संत श्री संताजी जगनाडे महाराज ह्याचा जन्म ८ डिसेंबर १९२६ मध्ये झाला व दि. २० डिसेबर १६९९ साली त्यांचे निधन झाले. तसेच लोकसंत स्वच्छतेचे महान पुजारी, लोकांच्या मेंदूतील घाण आपल्या कीर्तनाद्वारे काढूण टाकणारे व अंगात येणारे बाबा व देवी यांच्यापासून सावध राहण्याचे मंत्र देणारे निष्कामकर्मयोगी श्री संत गाडेबाबांचा स्मृतीदिन आम्ही भजन स्पर्धेच्या माध्यमातून साजरा करीत आहोत. या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
आयोजक डॉ. मेघनाथ शहा युवा मंडळ, दर्डा नगर, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष, अशोक चंद्रभानजी काळमोरे (मो. ९६५७०६०११७) टिप : श्री संताजी महाराज व संत श्री गाडगेबाबा यांचे पूण्यतिथी निमित्त स्वच्छता अभियान दि.८ डिसेंबर ला सकाळी ५.३० ते ८.०० पर्यंत राबविण्यात येणार आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade