याच मातीत जन्मलेले व पुणेकरांनी आपले म्हंटलेले श्री. हरिष सदाशिव देशमाने त्या काळातील पदवीधर. पुण्यात येऊन परस्थिती बरोबर दोन हात करीत कंपनीत नोकरी करू लागले. शालेय शिक्षण पुर्ण करित असताना उत्कृष्ट वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या भाषणाचा मोठा प्रभाव पडला यातुनच त्या ओघवत्या अभ्यासपुर्ण भाषा प्रभाव पडला आणि ते काही काळात भोसले यांच्या भाषणा सारखे बोलु लागले. समज मंत्र मुग्ध होऊ लागलासंत संताजी महाराजांच्या जीवनावर त्याच भाषण शैली प्रमाणे सिडी, कॅसेट करून ना नफा ना तोटा तत्वावर बांधवांना दिल्या शब्दाचे सामर्थ्य समय सुचकता या गुणामुळे श्री हरिष हे पुणेकरांचे आवडते झाले. विविध कार्यक्रमात समारंभात सुत्रसंचालनाची जबाबदारी ही यशस्वी पणे पार पाडु लागले. यामुळेच श्री. सुधीर गाडगीळ यांनी हरिष देशमाने यांच्या मांडणीची व भाषाशैलीची दखल घेऊन नोंद ठेवली ही मांडणी फार कमी सुत्रधाराकडे असते ही जाणीव त्यांनी करून दिली.