खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी धुळे महानगरी मध्ये समाजभूषण स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, हिरे भवन, कोर्टासमोर, स्टेशन रोड, धुळे याठिकाणी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्या मध्ये समाजबांधवांसाठी व उपस्थित राहणाऱ्या नागरीकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था मंडळाने केलेली आहे. या ठिकाणी कोव्हॅक्सीन व कोव्हिशील्ड दोन्ही प्रकारची लस देण्यात येईल. ज्यांचा पहिला डोस असेल त्यांना आधार कार्ड व स्वतःचा मोबाईल आणणे आवश्यक आहे. ज्यांचा दुसरा डोस असेल त्यांनी देखील आधार कार्ड व स्वतःचा मोबाईल जवळ ठेवणे आवश्यक आहे. मेळाव्यामध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस चे दोन्ही प्रकारचा पहिला व दुसरा डोस देण्यात येईल. तरी समाजातील नागरिक व बंधू-भगिनींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.