ओबिसीच्या व्यासपिठावर बाजू मांडण्यासाठी ओबिसी विषयांवर अभ्यास असलेले आपले महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांचे भाषण प्रत्येक ठिकाणी होणे आवश्यक - खा. रामदासजी तडस
नाशिक - राज्यस्तरीय पदाधिकारी, सर्व आघाडी विभागाध्यक्ष /विभाग सचिव, जिल्हाध्यक्ष व सचिव यांची रविवार दि . २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळ ६:०० वा.माननिय प्रदेशाध्यक्ष व खासदार श्री. रामदासजी तडससाहेब यांचे अध्यक्षतेखाली झूमसभा मोठ्या जोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली. महाराष्ट्रातील सर्व राज्यपदाधिकारी विभाग / जिल्हा / युवा / महिला / सेवा आघाडी अध्यक्ष व सचिव प्रदेशाध्यक्ष तथा खासदार श्री रामदासजी तडस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली , कार्याध्यक्ष श्री अशोककाका व्यवहारे , महासचिव डॉ . भूषण कर्डिले , कोषाध्यक्ष श्री गजानन नाना शेलार यांचे मार्गदर्शना खाली महाराष्ट्र स्तरावरील समाज जोडो अभियानच्या संघटनात्मक नियोजनासाठी झूम मीटिंग मध्ये उपस्थित होते . सदर मिटिंग मध्ये समाज जोडो अभियान या विषयावर अध्यक्ष व वरीष्ठ पदाधिकारी यांनी नियोजनपर मार्गदर्शन केले . या बैठकीचे प्रास्ताविक प्रदेश महासचिव डॉ . भूषण कर्डिले यांनी केले यावेळी सदर बैठकीचा प्रमुख विषय म्हणजेच समाज जोडो अभियान बाबत भूमिका मांडताना त्यांनी सांगितले की , २ जुलै च्या आंदोलनामुळे जागृती झाली आहे . मात्र न्याय हक्कासाठी अजून लढावे लागेल त्यासाठी येत्या ८ डिसेंबर संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज जयंतीपासून समाज जोडो अभियान सुरु करण्यात येईल. त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हानिहाय रथयात्रा / दिंडी काढण्याचा मानस आहे . संघटनेच्या बांधणीसोबत ओबिसी हा विषय घेवून भविष्यात पुन्हा एकदा २ जुलै ला झालेल्या आंदोलनाप्रमाणे नेतृत्व करावे लागेल तेली समाजाने नेतृत्व करत ओबिसीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . २जुलै २०२१ ला ३२५ ठिकाणी उपोषण / आंदोलन / निवेदन दिले त्याची दखल घेतली गेली . राज्य व केंद्र सरकारने दखल घेत आपल्या पत्रास उत्तर दिले.नुसते च ओबिसीच्या हक्काच्या मागणी करून चालणार नाही तर त्याकरिता सामाजिक लढा उभा करावा लागेल समाज जोडो अभियान अंतर्गत रथयात्रा काढावी अशी युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी व आपले खंबीर नेतृत्व असलेले कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या संकल्पनेतून पुढे आली. संपूर्ण राज्यात चांदा ते बांदा याच धर्तीवर सदुंबरे ते सदुंबरे रथयात्रा नेण्याचा मानस आहे . बैठक घेण्याचा उद्देश सुचना, दोष, उणिवा आल्यास त्या दूर करता येतील सामाजिक ताकद दाखवायची आहे . आभार प्रदर्शनही प्रदेश महासचिव डॉ . भूषण कर्डिले यांनी केले. पुन्हा लवकरच बैठक घेवून नियोजन करुन दौराचा मार्ग कार्यक्रम सर्वांना पीडीएफद्वारे पाठविण्यात येईल. आजची बैठक हेतू स्पष्ट करणारी होती.
प्रदेशाध्यक्ष खा . रामदासजी तडस यावेळी म्हणाले की, समाज जोडो अभियान बैठकीस सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून स्वागत व आभार मानतो. महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभाने अनेक बैठका झुम माध्यमाने घेतल्या . आपण समाज जोडो अभियान राबवित आहोत. ८ तारखेपासून अभियानाच्या माध्यमातून उर्जा मिळण्याचे काम होईल त्या त्या जिल्ह्यात संपूर्ण माहिती द्यावी लागेल. काय मार्गदर्शन याबाबत ठरवावे लागेल . रथयात्रा काढावी लागेल. शिस्तबध्द कार्यक्रम राबविला पाहिजे. रथयात्रेस मोठा खर्च लागेल याकरिता मी स्वतः २००००० - रुपये महासभेच्या खात्यात जमा करणार आहे. तसेच दि. १ जानेवारी २०२२ रोजी रक्तदान शिबिर अभियान राबविण्यात येणार असून सुमारे एक लाख रक्ताची बाटली गोळा करून गिनिज बुकात नोंद करणार आहोत . प्रत्येक जिल्ह्यात अभियान राबविले जाणार आहे . ओबिसीच्या व्यासपिठावर आपली बाजू मांडण्यासाठी ओबिसी विषयावर अभ्यास असलेले आपले महासचिव डॉ . भूषण कर्डिले यांचे भाषण प्रत्येक ठिकाणी होणे आवश्यक आहे . मी आजपर्यंत ओबिसीच्या जेवढ्या वक्तव्याचे भाषणे ऐकली त्यापेक्षा महासचिव यांचे भाषण व मुद्दे अधिक प्रभावी व अभ्यासपूर्ण असल्याचे माझे मत आहे. समाज जोडो अभियानास प्रत्येकाने आपआपल्या परिने मदत/ सहकार्य व उपस्थिती राहील याकडे लक्ष द्यावे मी एक महिना समाज कार्यासाठी देणार आहे.
कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार -यांनी समाज जोडो अभियान बाबतीत विस्तृत माहिती दिली. महासचिव डॉ . भूषण कर्डिले , ठाणे विभाग अध्यक्ष सुनिल चौधरी , युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी यांच्या चर्चेतून समाज जोडो अभियान पुढे आले. तर रथयात्रा काढावी अशी संकल्पना नरेंद्र चौधरी यांनी मांडली. समाज संघटनेच्या वाढीसाठी प्रयत्न करावा, समाज जोडो अभियानाचा भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात फिरायचे आहे . सदुंबरेपासून सुरुवात करणार आहोत. याकामासाठी मोठा खर्च होणार आहे. त्यासाठी पुढे यावे ज्यांना आर्थिक मदत करत येईल त्यांनी आर्थिक मदत करावी तर ज्यांना वेळ देता येईल त्यांनी वेळ द्यावा . मी १००००० / - रुपये याकरिता देत आहे . प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका घेणार आहोत. मार्गातील गावात रथयात्रेचे स्वागत करावे . प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेणार असून तसे नियोजन करावे. जनगणना साठी अॅप तयार करणार आहोत . अँप्सद्वारे गावोगावी जनगणना होवून समाजाला एकसंघ करण्याचा प्रयत्न करु वरिष्ठ नेत्यांनी आमच्या सोबत यावे . समाज दिंडी विविध संत स्थळाची भेट घेवून शेवटी नाशिकला समारोप होणार आहे . रथयात्रेत सहभागी व्हावे याकरिता बसदेखील करणार आहोत . आमदार / खासदार यांचे पत्र घेवून राहण्याची व्यवस्था करणार आहोत, आपणही करावी . जेवणाचा शिधा सोबत घेणार आहोत, स्थानिक ठिकाणी जेवणाची व्यवस्था करता आली तर तसे नियोजन करावे . एका दिवसात दोन जिल्हांना भेटी देणार आहोत . दीड महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत. ओबिसी आंदोलन जिवंत राहण्यासाठी चळवळ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाला पुढे न्यावी लागेल. ओबिसी प्रश्न आपल्या संघटनेमुळे लोकसभेपर्यंत गेला आहे . ओबिसीसाठी आणखी लढावे लागेल . रथयात्रेसोबत संताजी महाराजांचे दोन फुट उंचीचे पुतळे प्रत्येक जिल्ह्यास एक याप्रमाणे जिल्ह्यानिहाय दिले जातील. विलास त्र्यंबककर यांनी वाजवी मुळ मुद्दल किमतीत १०० पुतळे बनवून दिले आहेत . भविष्यात प्रत्येक तालुक्यास देण्याचा मानस आहे . रथयात्रा ज्या तारखेला ज्या जिल्ह्यात येईल त्या तारखेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे . संपूर्ण राज्याचा हा कार्यक्रम आहे . जिल्हास दिलेल्या कार्यक्रमानुसार नियोजन व्हावे ज्यांना दिलेली जबाबदारी पेलता येत नसेल तर त्यांनी जबाबदारी सोडून द्यावी. त्यांनी दुसऱ्यांना संधी द्यावी. सर्व आघाडी पदाधिकारी यांनी आवर्जुन उपस्थिती देत सोबत दिलेल्या कार्यक्रमाचे नियोजन करावे. संघटनेची ताकद वाढविण्यासाठी हे सर्व गरजेचे आहे . धुळे जिल्हयात ओबीसी आंदोलन नंतर सर्वच पक्षांनी प्रमुख पदे तेली समाजातील व्यक्तींना दिली आहेत . संघटनेची ताकद आपली ताकद वाढविते कोणत्याही पक्षात काम करा स्वतः सोबत समाजाचा फायदा करून घ्या .
युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी - समाज जोडो रथयात्रेत सर्वांनी मोठ्या उत्साहात जल्होषात सहभागी व्हावे. बँड ,वारकरी ,भजने गात,आतिषबाजी, रांगोळी काढून रथयात्रेचे स्वागत करावे . तसेच रथयात्रेत जिल्हा निहाय वाटप होणारे संताजी महाराज यांच्या पुतळ्याचे जोरदार स्वागत करावे . समाज जोडो अभियान रथयात्रेबाबत काही सुचना असल्यास कळव्यावात . युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे . महिलांनीही स्थानिक ठिकाणी सहभाग नोंदवावा . वरिष्ठांनी रथयात्रेस वेळ देवून प्रत्यक्ष सहभाग नोंद करावा . विविध आघाड्यानी समन्वय साधत रुपरेषा आखावी , रथयात्रेचे नियोजन मोठे असून आपआपल्या परिने सक्रीय सहभाग घेवून कामाची जबाबदारी घ्यावी .
संजय हिंगासपूरे - विभागाच्या वतीने १०१००० / - रथयात्रेकरिता देणार आहोत . अकाउंट नंबर द्यावा . आम्ही रक्तदान कार्यक्रम घेतला सर्वांना सोबत घेतले रक्तदान शिबीर परत घेवू . रथयात्रा स्वागतासाठी कधीही तयार आहोत .
संजय चौधरी , शिरपूर- ओबिसी तील इतर समाज बांधवांचा या रथयात्रेत सहभाग करुन घ्यावा . आम्ही रथयात्रेत सहभागी होवू व सर्वतोपरी मदतही करु .
माधवराव शेजूळ - संकल्पना उत्तम आहे. रथयात्रेस परवानगी घ्यावी . रथयात्रेस २०००० / - देत आहे .
रमेश गवळी , कोपरगाव - चांगला उपक्रम घेतला. नगर जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो अनेक वर्षापासून समाज जोडण्याचे काम करतो आहे . समाज जोडो अभियानातून समाज जोडला जाईल . चालना मिळेल . महाराष्ट्रात सहकार्य मिळेल . चांगले काम होईल . समाज जोडण्याचे काम कौतुकास्पद आहे . नगर जिल्हयात यथोचित सहकार्य करु नजिकच्या जिल्ह्याने रथयात्रेसोबत येवून सहकार्य करावे .
पोपटराव गवळी ' - समाज जोडो अभियान रथयात्रा आम्हाला आवडली आहे . सातारा जिल्ह्यात स्वागत करु . जिल्ह्यात या, कितीही लोक या, जेवणाची व्यवस्था करु, सातारा जिल्ह्यात ओबीसी रथयात्रा विविध विषय जाणवून घेवू .
विलास त्र्यंबककर - मुंबईकडून सर्वातोपरी सहकार्य मिळेल .
सागर करपे- समाज संघटन करिता काही योजना आखाव्यात .
अमोल आगाशे - अमरावती यवतमाळ मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवू रथयात्रेचे स्वागत करु. सर्वांना गोळा करु. समाजाची एकी दाखवावी. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करु .
तुषार काचकुरे , बुलढाणा- रक्तदानाकरिता प्रेरित करु सुचना मागव्यात सर्वांचे सहकार्य घेवू.
शिवाजी झगडे - . मुंबईत आपले स्वागत / सहकार्य करु , यथोचित मदत होईल जास्तीत जास्त मदत करु ,
निलेश सोनवणे , औरंगाबाद विभाग अध्यक्ष - आमचा विभाग मोठ्या प्रमाणात सहभागी होईल . दुसऱ्या जिल्ह्यातील पदाधिकारी सोबतच्या जिल्ह्यात यावेत . कार्यक्रमाची अगोदर कल्पना द्यावी . उपक्रम चांगला आहे . वरिष्ठ सांगतील ती मदत करु आता ५१००० / रथयात्रेकरिता देत आहे .
डॉ . रावसाहेब शंकपाळ - प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नियोजन करता येईल . दुसरे जिल्ह्यात प्रस्थान करताना संघटन दिसून येईल . विभागात बैठक घेवून मदत करु
सौ . पुष्पाताई बोरसे , ठाणे विभागीय महिला अध्यक्ष - छान उपक्रम आहे . मरगळ आली आहे , रथयात्रेमुळे चेतना निर्माण होईल . ओबिसी राजकीय / सामाजिक पातळीवर आपल्या संघटनेचे व समाजाचे महत्व वाढेल . ठाणे विभागाकडून मदत करु .
विठ्ठल रणबावरे , राज्य युवा संघटक- रॅली जिव्हाळ्याचा विषय आहे . भूतो न भविष्यतो रथयात्रेमुळे रेकार्ड ब्रेक होईल . जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा . तालुकानिहाय स्वागत करावे मिडियाचा सहभाग घ्यावा . स्वयंपूर्तीने लोक रथयात्रेत येतील . नोंदणी करावी.
प्रभाकर गजरे - डॉ . भूषण कर्डिले यांची ओबीसी विषयावर रथयात्रेत भाषणाची कॅसेट लावावी .
रवि सोनवणे , नांदेड - महाराष्ट्र पिंजून निघणार आहे . चांगली संकल्पना आहे . स्वागत करुन रथयात्रेस शुभेच्छा .
अॅड . शशिकांत व्यवहारे महत्वाचे अभियान आपण घेत आहोत . संकल्पना उल्लेखनिय आहे एकत्रित येण्यासाठी ताकद दाखविण्यासाठी योग्य आहे .
प्रियाताई डिंगोरकर - समाज जोडा रथयात्रेत युवकांनी प्रामुख्याने पुढे यावे . युवकांना फायदा होईल . युवक / महिलांनी फलक बनवून - स्वागत करावे . समाज संघटीत करावा .
सौ . विद्याताई करपे , नाशिक विभागीय महिला अध्यक्ष- हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नवचैतन्य ठरविणार असून महिला जबाबदारी पार पाडू . गाव तेथे प्रांतिक अनुकुल वातावरण तयार होईल . समाज रथ निघाल्याने वातावरण तयार होईल . आम्हाला त्याचा फायदा होईल . रथयात्रेसाठी बस देण्यास तयार आहे . शिर्डी येथे मोफत वधु - वर मेळावा घेतला असून वधु वर नोंदणी व जेवण विनामुल्य आहे सर्वांनी मेळाव्यास उपस्थित रहावे असेच आज आमंत्रण देते . रथयात्रेमुळे वेगळा व चांगला संदेश जाईल.
सतिष वैरागी- रथयात्रेस शुभेच्छा. कोकणात स्वागत करू रथयात्रेस२५०००/-देतो.