भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
मृत्युलाही थांबविणारे गो.ना. चौधरी :- त्यानंतर ही धुरा गो.ना. चौधरींच्या संताजी प्रसाद ने संभाळलेली दिसते. मुळात खानदेशचे गो. ना. मंबईत स्थिरावले ! सामाजिक प्रबोधनाच्या उर्मिने झपाटलेले गो. ना. नी मासिक काढण्याचे ठरविले तसे ते प्राथमिक शिक्षक होते. नोकरी करुन प्रबोधनाचे कार्य करावयाचे होते. मासिकासाठी लागणारा कागदाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी धोटे शेठांना विनंती केली. धोटे शेठांना आशिया खंडात मोठा छापखाना होता असे सांगतात. मंबई, कलकत्ता, येथून छपाई मशिनची व मुद्रण साहित्याची विक्री होत असे त्यांनी गो. ना. चौधरींना मोफत कागद पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मुख्य अडचण सुटल्याने या मासिक बर्याच काळ खानदेश उत्तर महाराष्ट्र मंबई कोकण भागत स्थान मिळवणे माहितीवजा जरी त्याचे स्वरूप होते तरी जागृतीची भुमिका निभावली. मृत्यूच्या दिवशी मृर्त्यपुर्वी त्यांनी संताजी प्रसादाचे अंक डोक्याखाली ठेवले. मग प्राण सोडला ! केवढी समाजप्रियता !