धुळे - खान्देश तेली समाज मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून आजपर्यंत त्यांनी समाजासाठी भरीव योगदान दिले असल्याचे मत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युवराज करनकाळ यांनी व्यक्त केले. ते खान्देश तेली समाज मंडळ धुळे शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
धुळे शहरातील आय. एम.ए. हॉल येथे मंडळाचे वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा,रोग निदान शिबिर, लाकडी तेल घाणा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जीवन चौधरी गटनेते नपा.चोपडा, सुनील चौधरी विरोधी पक्षनेता शिंदखेडा, मजूर फेडरेशनचे माजी सभापती राजेंद्र महाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजीत राजे भोसले, नगरसेवक नरेश चौधरी,सौ.प्रतिभाताई चौधरी, नागसेन बोरसे, नितीन चौधरी, मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी,कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी,समाज सारथी गिरीष गुलाब चौधरी, प्रदेश तेली महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष के. डी. चौधरी चोपडा, जोगाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील, मालेगाव तेली समाजाचे अध्यक्ष रमेश उचित, मालेगाव येथील राजेंद्र सखाराम चौधरी, खान्देश मंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सौ.सुनंदाताई चौधरी, धुळे जिल्हाध्यक्ष मालतीताई चौधरी, डॉ.सौ.नीलिमा चौधरी, सौ. सविता चौधरी, दिलीप चौधरी अक्कलकुवा आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की मंडळाने समाज कक्षेबाहेर जात नुकतेच जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केलेले निदर्शने व पाहणी दौरा स्तुत्य असून यापुढे देखील त्यांचे सर्व कार्यक्रम यशस्वी होत राहतील व आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहोत असे त्यांनी नमूद केले. यावेळी आदर्श शिक्षक जगदीश केशव चौधरी डोंबिवली व मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश धनजी चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. दीडशे विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या ठिकाणी झालेल्या रोगनिदान शिबिरात शेकडो समाज सेवक बंधू-भगिनी यांची तपासणी करण्यात आली. यावेळी झालेल्या तेलघाणा प्रशिक्षण शिबिरात ओ.बी.सी. चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन प्रा. वंजारी यांनी मार्गदर्शन केले. या शिबिर प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी समाजातील युवकांना उद्योगाकडे वळण्याचे आवाहन करून जिल्हा परिषद मार्फत योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रशिक्षण शिबिरात चंद्रकांत पाटील, जयवंत चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री संताजी महाराजांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी यांनी तर सूत्रसंचलन मुख्य सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शहर कार्याध्यक्ष अमोल चौधरी, शहर सचिव राकेश चौधरी, उपाध्यक्ष चंद्रकांत चौधरी, ललित चौधरी,भटू चौधरी,भाऊसाहेब चौधरी, सुनील चौधरी, गजानन चौधरी, प्रवीण चौधरी, कमलेश चौधरी, प्रतीक चौधरी यांनी परिश्रम घेतले.