राज्य प्रांतिक तेली युवा आघाडीची स्थापना

देशसेवा व समाजकार्यात युवकांनी पुढाकार घ्‍या - हरिभाऊ डोळसे

     अहमदनगर  - युवा पिढीने समाजसेवेचे व देशसेवेचे कार्य करून भारत देशाला बळकटी देण्याचे कार्य करावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नपूर्तीचे कार्य युवाशक्तीने हाती घ्यावे. देशाच्या विकासात युवाशक्तीचे मोलाचे योगदान आहे. या उद्देशाने नगर शहरातील तेली समाजातील युवक संघटित झाले आहेत. युवाशक्तीच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न व समाजाचे प्रश्न सोडविण्याचे कार्य महाराष्ट्र प्रांतिक महासभेच्या माध्यमातून केले जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले.

    टिळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात महाराष्ट्र प्रांतिक तेली युवा आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. याप्रसंगी महानगर कार्याध्यक्ष कृष्णकांत साळुके, सेवा आघाडीचे अध्यक्ष श्रीराम हजारे, सुरेशराव देवकर,विलासराव काळे, महानगर शहर उपाध्यक्ष सचिन म्हस्के, विश्वहिंदू परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे, गोरक्षनाथ व्यवहारे, योग शिक्षक प्रमोद डोळसे आदी उपस्थित होते.

Raja prantik teli Yuva aghadi sthapna     कार्यक्रमाच्या सुरुवातीला संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीत तेली युवा आघाडीचे अध्यक्षपदी विक्रम शिंदे,उपाध्यक्षपदी प्रफुल्ल साळुके,कार्याध्यक्षपदी गणेश धारक,सचिव शुभम जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

     कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोनल काळे, श्रीकांत ढवळे, सागर शिंदे, शुभम भोत, अभिजीत म्हस्के, योगेश भागवत, महेश थोरात, सचिन देवकर, श्रीपाद डोळसे, योगेश शिंदे, गणेश दहितुले, गणेश डोळसे, दीपक शेलार, आनंद दारूणकर, गौरव क्षिरसागर, अमित डोळसे, विशाल क्षिरसागर, राहुल म्हस्के, गणेश म्हस्के, चेतन डोळसे, रुत्विक डोळसे, धनंजय जाधव, प्रथमेश काळे, अभिषेक रणखांब, गिरीश चोथे,प्रदीप मगर, प्रफुल्ल मगर, गणेश धारक आदींनी परिश्रम घेतले.

दिनांक 04-10-2021 07:24:39
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in