जय संताजी प्रतिष्ठाण, बीड जिल्हा आयोजित तेली समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय तैलिक साहू महासभा, नवी दिल्ली तथा समाजभूषण आदरणीय ना.जयदत्तजी (आण्णासाहेब) क्षीरसागर यांच्या शुभहस्ते आज बीड येथे स्व. सोनाजीराव (नाना) क्षीरसागर या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी संताजी जगनाडे महाराज,स्व.काकू-नाना व सरस्वती प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. आदरणीय ना.आण्णासाहेब यांचे स्वागत तेली समाज ज्येष्ठ मार्गदर्शक बांधवांना तर्फे करण्यात आले व नंतर जय संताजी प्रतिष्ठाण, जिल्हा बीड कार्यकारिणी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मध्ये प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिवलिंग क्षीरसागर यांनी आदरणीय आण्णासाहेब यांनी समाजातील विद्यार्थ्यांना कशाप्रकारे सहकार्य केले व समाजासाठी त्यांचे योगदान तसेच विद्यार्थ्यांनी जिद्दीने, चिकाटीने व ध्येय साध्य करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष यांची गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप, आशिर्वाद रूपी शुभेच्छा नेहमी पाठीशी असाव्या म्हणजे विद्यार्थी प्रचंड ऊर्जा, प्रबळ इच्छाशक्ती व अफाट आत्मविश्वासाने यशाची पायरी साध्य करेल, असे समाजापुढे विचार मांडले.तर राष्ट्रीय अध्यक्ष ना.आण्णासाहेब यांनी विद्यार्थ्यांनी या टेक्नॉलॉजीच्या युगात व स्पर्धेच्या गुणवत्तेत पुढे जाण्यासाठी आपले मनोबल व आत्मविश्वास कमी न होऊ देता, यशाचे शिखर शांत,संयमाने व आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर आत्मसात करून साध्य करायला हवे, जेणेकरून समाजाचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उंचावेल,असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.. २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षातील प्रथमतः १० वी,१२वी प्रथम, द्वितीय व तृतीय व नंतर ८०% पेक्षा जास्त घेतलेल्या,पदवी प्राप्त, विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार आदरणीय ना.आण्णासाहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जय संताजी प्रतिष्ठाण चे अध्यक्ष रामेश्वर (तात्या)पवार यांनी केले.यावेळी तेली समाजातील सर्व बंधु-भगिनी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकारीणी ने अथक परिश्रम घेतले.