दि.१ जानेवारी २०२१ ते २० डिसेंबर २०२२ हे वर्ष श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी शताब्दी वर्ष म्हणून तिर्थ क्षेत्र, संतुबरे येथे साजरे होत आहे. या निमित्ताने संताजी महाराजाच्या पादुका व गाथा यांची भव्य रथयात्रा महाराष्ट्रभर काढण्याचे नियोजित आहे. या निमित्ताने सर्व समाज बांधवांना महाराजांचे पादुका व गाथा यांचे दर्शन घेता येईल. याची सुरुवात दि. ८/१२/२०२१ रोजी महारांची जयंती दिनांका पासून श्री क्षेत्र संदुबरे येथून सुरुवात होत आहे. रथयात्रा शुक्रवार दि.१०/१२/२०२१ दुपारी २.०० वा. सातारा येथे येणार असून त्यांचे स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. रथ यात्रा पुढील महिनाभर महाराष्ट्राच्या सर्व जिल्हातून जाणार आहे. त्यायोगे समाजामध्ये जनजागृती करुन समाज जोडो हे अभियान राबविण्यात येत आहे. या शिवाय रद्द झालेले, ओ.बी.सी. आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी जनजागृती करण्याचेही नियोजित आहे. समाज बांधवांना शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण पुन्हा मिळालेच पाहिजे हा सर्वसामान्य मानसाचा जिव्हाळाचा विषय आहे. रथ यात्रेच्या निमित्ताने महाराजांच्या पादुका व गाथा यांचे दर्शन होणारच आहे. परंतु सर्व समाज बांधवांनी या निमित्ताने या ठिकाणी एकत्र येवून समाज जागृतीचे एकजुटीचे दर्शन घडवावयाचे आहे.
या कार्यक्रमांच्या वेळी आपण सातारा जिल्ह्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये ५०००/- हजार शिष्यवृत्ती स्वरुपात देत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ओ. बी. सी. आरक्षण म्हणजे नक्की काय ? व समाजासाठी त्याची आवश्यकता काय.? या विषयांवर डॉ. भूषण कर्डिले (महासचिव) हे मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर सर्व समाजबांधवासाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व बांधवांनी याचा लाभ घ्यावा. सायं. ५ वा. नंतर रथयात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे.
यानिमित्ताने या ठिकाणी समाजाबांधवांच्या मागणीवरुन वधूवरांची नोंदणी करण्यात येणार असून वधूवर पालक यांचे भेटी-गार्टीचा कार्यक्रम सकाळी १० वा. ते १.३० वाजेपर्यंत ठेवला आहे. यासाठी कोणतीही फी,प्रवेश शुल्क इ.आकारले जाणार नाही. तरी या संधीचाही फायदा समाज बांधवांनी घेणेचा आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तेलिंक महासभा पश्चिम विभाग महाराष्ट्र समस्त तेली समाज सातारा जिल्हा श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा-महाराष्ट्र मा. पोपटराव गवळी मा. राम पडगे मा. विठ्ठलराव क्षीरसागर मा.सौ. सुरेखा हाडके मा. संजय शेडगे मा. नामदेवराव झकडे मा. पोपटराव भोज मा.हणमंत चिंचकर मा. सौ. कुसूम मेरुकर मा. अमोल राऊत मा. रमेश पवार मा. अनिल बेंद्रे मा. प्रदिप देशमाने मा. सौ. प्रिया गंधाले मा. नितीन देशमाने मा. लक्ष्मण गवळी मा. सुनिल किरवे मा. अमोल झगडे मा. सौ. शारदा किरवे मा. संजय भोज • दर्शन स्थळ : साई दत्त मंगल कार्यालय, वाढे-फाटा सातारा दि. १०/१२/२०२१ सकाळी १० ते ५ वा.