भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
तेली समाज जागृतीकार पांडुरंग पिसे :- तौलिक प्रबोधनात सिंहाचा वाटा असणारे पांडुरंग पिसें बाबत जेवढे लिहावे तेवढे कमीच होईल. 1975 ते 2005 अशी तब्बल 30 वर्ष तेली बहुल म्हणजे विदर्भात तेली समाज जागृती हे मासिक अव्याहतपणे प्रकाशित केले चांदा टू बांदा असा उभा महाराष्ट्र पालथा घातला, 1999 मध्य स्नहीपुकार साप्ताहिकही काढले पुढे त्याचेच मासिकात रूपांतर झाले. महाराष्ट्र प्रदेश तेली युवक संघटनेच्या मदतीने त्यांनी जनजागृतीसाठी मासिक कसे गरजेचे हे पटवुन दिले, तेली जातीचा समावेश एस.सी. मध्ये व्हावा म्हणून चकक 45 दिवस साखळी उपोषण केले. त्यांना माजी आ. अ. ल. वाघमारे यांची प्रेरणा होती. रात्रीच्या शाळेत शिकून मिल कामगार बनलेल्या पिसें 1980 मध्ये नागपुर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदी निवड झाली 1982 मध्ये विधान भवना समार आमरण उपोषण करून तेली समाजाच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले पुढे तेली समाज ओबीसी मध्ये टाकण्यात आला. 1975 मध्ये वधुवर परिचय मेळावा घेणारे ते पहिले ठरले नेहरू बाल भवनात सामुदायिक विवाह ही त्यांनी आयोजित केले. केवळ मासिक नाहीतर तेली समाजाच्या ध्यास घेतलेल्या. या समाजसेवकाला समाजसेवे पायी 2 घरे विकावी लागली हे अनेकांना माहित नाही पण समाज उत्थानासाठी उपोषण, आंदोलन मोर्चे, मेळावे हे कार्य चालुच ठेवले.