भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
डॉ. शरद महालेंचे तेली समाज सेवक :- आज महाराष्ट्रात तेली समाजसेवक मासिकाने मानाचे स्थान मिळविले आहे. यात शंका नाही 30 पानांचे सकस मजकुर तेल्यांनी तेल्यांकरवी चालविलेले समाजाची सामुदायिक मालकी अशी घटना आसलेल हे मासिक स्थिर पायावर उभे करण्यासाठी ज्या माणसाचे मोठे योगदान आहे ते म्हणजे डॉ. महाले सुमारे 35 वर्षापुर्वी निवृत्ती महाले व त्यांचे सहकारी एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करावे ही उर्मी ठेवुन संताजी मंडळ काढले. या मंडळामार्फेत मासिक असावे ही संकल्पना राबवली गेली. त्यासाठी मंडळ बपीटी अॅक्टखाली नोंदले गेले आज त्याचीच फलश्रुती म्हणुन हे कसदार मासिक उभे आहे त्यामागे डॉ. महालेंची योगदान म्हणजे पाठीच्या कण्यासारखे आहे. भक्कम आर्थीक पाठबळ उभारण्यात त्यांचा व मंडळ सदस्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज मुदत ठेवीवरील व्यजावर हे मासिक चालते चार हजार पेक्षा जास्त कायम सभासद आहेत.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade