भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
प्रा. कर्डीले, प्रबोधनातील कोहीनुर हिरा :- तेली समाज सेवकाला उच्चतम पातळीवर पेहचविण्यासाठी 30 वर्षाहून अधिक काळ ज्यांनी दिले ते म्हणजे प्रा. वसंतराव कर्डिले त्यांनी लिहीलेल संपादकीय म्हणजे अमृताची खानच ! म्हणनच त्यांना भिष्माचार्य ही संबोधतात - नोकरी सर्व करतात परंतु नोकरी करून सातत्याने समाजाशी प्रकाशमान ठेवणारे प्रा. कर्डिलेंचे ऋण समाज कधीच विसरू शकत नाही. तेली समाज सेवक मासिकातील संपादकीय लेखांचा संग्रह असलेले कथा आपल्या हक्क लढ्याची हे पुस्तक प्रत्येक समाज बांधवाच्या घरी नुसत संग्रही नको तर त्याची पारायणे झाली पाहिजेत. त्यांची पितृत्वाची भूमिका स्विकारून इतर मासिकांना मार्गदर्शन केले एवढेच नव्हे तर सुतार, लोहार , कुंभार व अन्य ओबीसी प्रवर्गातील जातींचा मासिक प्रा. कर्डीलेंच्या मार्गदर्शनाने सुरु झालीत तौलिक महासभेला वैचारिक खाद्य पुरविण्याचे काम प्रा. कर्डीले यांनी पुरविले आहे. म्हणुनच त्यांचा अमृतमहोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे.