रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघ (उप शाखा रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ) - तेली समाजाची अस्मिता संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाज जोडो रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्हयांतून या समाज जोडो रथयात्रेचा प्रवास होणार आहे. महा प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष मा.खा.रामदासजी तडस, महासचिव डॉ. भूषणजी कर्डीले आणि कोषाध्यक्ष गजुनाना शेलार, कार्याध्यक्ष मा.अशोकजी व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली ही रथयात्रा सुदुंबरे (जि.पुणे ) येथून सुरू झाली आहे. कोकण विभागिय अध्यक्ष . सतीशजी वैरागी व जिल्हाध्यक्ष रघुविरजी शेलार यांच्या मार्गदशनाखाली आपल्या रत्नागिरी तालुक्यात रविवार दिनांक १२/१२/२०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता येणार आहेत. सर्वानी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहून अतिशय उत्साहाने या रथयात्रेचे स्वागत करण्याचे आव्हान करण्यात आले आहेत. आपल्या सामाजिक अस्मितेचे आणि एकजुटीचे दर्शन घडविण्यासाठी फार संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रम पत्रिका - रविवार दिनांक १२/१२/२०२१ सांयकाळी ५ वाजता :- मु.पो.नांदळज तालुका संगमेश्वर येथुन हातखंबा तिठा येथे आगमन व तेथुन तमाम रत्नागिरी करांच्या उपस्थित रथसभेचे स्वागत. सांयकाळी ५.३० वाजता :- तेली आळी नाका रत्नागिरी येथे आगमन व तेथुन संताजी जगनाडे महाराज मंदिरापर्यंत मिरवणुकीचे स्वागत. सांयकाळी ६.३० वाजता:- १) डॉ.पंकज बंदरकर यांच्या घरी तळमजल्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आणि तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन. २)प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार. ३)रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघ प्रकाशित दिनर्शिका प्रकाशन सोहळा. ४) मान्यवरांचे मार्गदर्शन.
सदर आव्हान श्री.संदीप (बावा) कृष्णा नाचणकर अध्यक्ष रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघ आणि सर्व पदाधिकारी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.