श्री संत संताजी महाराज यांची जयंती बरबडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. संताजी महाराज हे कुशल असणारे शिष्य होते. त्यांनी समाज परिवर्तनाचे काम केले. यांच्या जीवनावर सरपंच माधव कोलगाणे, प्रल्हाद जेटेवाड, शंकर बनसोडे यांनी थोडक्यात प्रकाश टाकला. आणि यावेळी या समाजासाठी मंदिर बांधून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे सरपंचांनी सांगितले. तर जेटेवाड यांनी तेली समाजाविषयी असणारी भावना या काळात बदलणे गरजेचे आहे, असे सांगून त्यांच्या विषयी आस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे असे सांगितले.
यावेळी सरपंच माधवराव कोलगाणे, ग्रा.पं. सदस्य बालाजीराव धर्माधिकारी, प्रल्हाद जेटेवाड, गंगाधर रुद्रवाड, डॉ. संजय व्यंकटपूरवार, ज्ञानवर्धिनी इग्लीश स्कूल बरबडाचे मुख्याध्यापक डी. बी. घोडेकर, सर्व तेली समाज शंकर बनसोडे, शिवाजी रणखांबे, गजानन रणखांबे, बालाजी रणखांबे, शिवकुमार वाघमारे, बबन आळणे, शिवाजी आळणे, गोविंद सोळंके, मारुती रणखांबे, राजेश पटवे, शिवराज बनसोडे, नितीन रणखांबे तसेच पत्रकार बापूराव बडुरे, किरण हनुमंते आदींची उपस्थित होते. यावेळी संताजी जगनाडे महाराज यांचे तेली समाज मंदिर गावात व्हावे, अशी सर्व तेली समाजाच्या वतीने ग्रामपंचायतीकडे मागणी करण्यात आली.