रावेर शहर साकळी येथे श्री संताजी तेली समाज पंच मंडळाच्या वतीने दि. ८ रोजी श्रीसंत शिरोमणी संताजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रतिमेचे पूजन तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळा अश्या संयुक्तिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजातील ज्येष्ठ नागरिक दगडू कपले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य श्रीमती रुक्माबाई निळे, पुंडलिक जावरे (नायगाव), साकळी केंद्र शाळेचे प्र.केंद्रप्रमुख किशोर चौधरी, श्री भवानी माता बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष भागवत रावते ,साक ळी पीकसंरक्षण सोसायटीचे पांडुरंग निळ,सेवानिवृत्त सैनिक निलेश खेवलकर,भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चौधरी,शिक्षक अरुण सर, अरुण खेवलकर,किशोर खेवलकर,खंडू जावरे (नायगाव) आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर गावपरिसरातील ज्या समाज बांधवांची संस्थानच्या विविध पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर इयत्ता दहावी व बारावी तसेच इतर शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद निळे (साकळी) यांनी साकळी येथील तेली समाजाच्या मंगल कार्यालयासाठी अकराशे स्क्वेअर फुट जागा दान दिल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण खेवलकर यांनी तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण तेली यांनी केले. गणेश महेश्री, उत्सव समिती अध्यक्ष रामा निळे, यांचेसह अशोक चौधरी, नितीन फन्नाटे, छोटू फन्नाटे, बाळकृष्ण मनसोटे, मनोहर निळे,उत्सव समितीचे सचिव पंकज महेश्री, आत्माराम बोराखडे, मुकुंदा बोराखडे, यांचेसह सर्व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.