जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे अभंगाचे लेखक व आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती समस्त तेली समाज ,राजगुरूनगर यांचे वतीने साजरी करण्यात आली . बुधवार दि ०८/१२/२०२१ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत तिळवण तेली समाज कार्यालयाचे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संताजी महाराज यांची जयंती उत्सव साजरा झाला.
प्रथमत: जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री जयप्रकाश मारूती कहाणे आणि खेड तालुका खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष श्री अनिल जगन्धथ कहाणे यांचे शुभहस्ते श्री संत संताजी महाराजांचे प्रतीमेचे पुजन करण्यात आले .तसेच संत संताजी जगनाडे महाराज यांनी स्वत: हस्तलिखित गाथाचे पुजनही मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संताजी महाराज लिखित दोन अभंगाचे वाचन श्री जयप्रकाश मारूती कहाणे यांनी करून त्याचा मराठी अनुवाद समजावुन सांगितला.संतांचे विचार आचरणात कसे आणावयाचे ? याबाबतही माहिती दिली.
जेष्ठ मार्गदर्शक व खेड तालुका खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष श्री अनिल जगन्नाथ कहाणे यांनी यानिमीत्त समाजात जागृती होऊन समाजात वैचारीक प्रगल्भता येण्यासाठी व विकासासठी प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी स्विकारून कार्य केले पाहिजे याबाबत मार्गदशन केले .सर्वांनी एकदिलाने ,एकविचाराने काम केल्यास समाज प्रगती साधेल परंतु ,समाजातील स्त्री-पुरूष लहानथोर व्यक्ती यांचे सर्वांगिण विकासासाठी कार्य होणे आवश्यक असल्याचे नमुद केले .समाज-बांधवांना हाक मारली तर आवर्जुन उपस्थित राहणे गरजेचे आहे परंतु काही समाज-बांधव उपस्थित राहत नाही याबद्दल खंत व्यक्त केली .संताजी महाराज लिखित गाथा समाजाला पाहण्यासाठी व अभ्यासण्यासाठी उपलब्द करण्यासाठी विशेष परीश्रम घेतल्याबद्दल संजय फल्ले यांचे कौतुक श्री अनिलशेठ कहाणे यांनी केले .मोडी लिपित असलेल्या अभंगाचे मराठीत भाषांतर झाल्यानंतर सर्वांनी अभंग अभ्यासावेत असे आवाहनही त्यांनी केले.
उत्तर पुणे जिल्हा प्रांतीक तैलिक महासभाचे अध्यक्ष श्री अविनाश तुकाराम कहाणे यांनी त्यांचे मनोगतात संताजी महाराज यांचे जन्मस्थान असलेले चाकण येथुन आजपासुन सुरू होणार्या " समाज जोडो अभियान व ओ बी सी जोडो अभियान " याविषयी निघणार्या रथयात्रेची माहिती उपस्थित समाजबांधवांना दिली .तसेच , या आठवड्यात एक दिवस रथ राजगुरूनगर शहरात येईल तेव्हा रथयात्रेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केलेत.रथयात्रेची तारीख नंतर समजेल.
याप्रसंगी जेष्ठ समाज-बांधव सर्वश्री दिलीप तुकाराम कहाणे ,माजी उपसरपंच श्री बाळासाहेब कहाणे , राजगुरूनगर बँकेचे संचालक धनंजय कहाणे ,शामराव व शशिकांत कहाणे ,विमा प्रतीनिधी सुधीर येवले , निवृत्त कृषि अधिकारी संजय फल्ले ,मनोज कहाणे ,अशोक नारायण कहाणे , लक्ष्मणराव वाव्हळ सचिन कहाणे , शिवाजी खळदर ,भारत हाडके ,रामभाऊ करमारे ,पप्पु रविंद्र कहाणे , अजय उर्फ मामु कहाणे उपस्थित होते .