तेली समाजाचे आराध्य दैवत व तुकाराम महाराजांचे मूळ कथेचे लेखनकर्ते संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची ३९७ वी जयंती संताजी महाराज जगनाडे सभागृह जुनी वस्ती मुर्तिजापुर येथे साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून हारअर्पण करण्यात आले यावेळी संताजी सेनेचे तालुकाध्यक्ष सुमीत सोनोने यांनी संताजी महाराजा बद्दल विचार व्यक्त केले व तेली समाज बांधवानी गावा गावात व प्रत्येक घरात संताजी महाराज प्रतिमा असलीच पाहिजेव समाज बांधवांनी संताजी महाराज जयंती निमित्त गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.तेली समाजाला आव्हान केले गावागावात संताजी महाराज जयंती साजरी करावी विविध उपक्रम राबवून समाज बांधवांना मदत करण्यास पुढे यावे. यावेळी संताजी सेनेचे राहुल गुल्हाने, स्वप्निल बनारसे, निलेश सुखसोहळे, योगेश आगाशे, मंगेश अंबाडकर,संताजी सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अतुल नवघरे, रवी हरणे, शैलेश शाहु, अंकुश गुल्हाने, सुरज गुल्हाने आदी संताजी सेनेचे कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.