धुळे : कोरोना संसर्गाच्या काळात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी सामाजिक दायित्व स्वीकारून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवक महासंघातर्फे संत जगनाडे महाराजांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
प्रथम जगनाडे महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शिबिराचे उद्घाटन माजी महापौर भगवान करनकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी भगवान करनकाळ म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रक्त उपलब्ध करणे कठीण झाले. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवक महासभेने राबवलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध होऊ शकेल, अशी भावना माजी महापौर भगवान करनकाळ यांनी व्यक्त केली.
यावेळी भगवान करनकाळ, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी, महानगरप्रमुख सतिष महाले, मनोज मोरे, माजी नगरसेवक कैलास चौधरी, महापालिकेचे महापौर प्रदीप करें, माजी महापौर जयश्री अहिरराव, किशन थोरात, संदीप चौधरी, विनोद चौधरी यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरात जवळपास पन्नास तिरुणांनी दुपारपर्यंत रक्तदान केले होते. शिबीर सायंकाळपर्यंत अखंड सुरू असेल असं समाजाच्या वतीने सांगण्यात आले. रमेश परांका, किशोर थोरात, महेश चौधरी. गणेश चौधरी, कल्पेश थोरात, तुषार चौधरी, किरण बागुल, पिंटू चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या शिबिरास सहकार्य केले. तसेच याप्रसंगी महाप्रसाद देखील वाटप करण्यात आले.