देऊळगावराजा - तुकाराम महाराजांचे वंशज गोपाळबाबा मोरे यांनी तर म्हटले आहे, संताजी तेली बह प्रेमळ अभंग लिहीत बसे जवळ धन्य त्याचे सबळ संग सर्वकाळ तुक्याचा आणि भक्ती लीलामृत या ग्रंथात, संताजी तेली वैष्णववीर तसेच तुकारामांची गाथा संताजीच्या अथक परिश्रमांमुळेच जिवंत राहू शकली, असे प्रतिपादन गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती निमित्त छोटे खानी कार्यक्रमत केले. तसेच शासकीय स्तरावर सर्व कार्यलयामध्ये मोठ्या भक्ती भावाने उत्सहात साजरी करण्यात आली.
स्थानिक पंचायत समितीच्या शिक्षण सभागृहात दि.८ डिसेंबर रोजी सकाळी मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महाआरती, छोट्याखानी कार्यक्रमासह आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे होते, तर प्रमुख पाहूणे म्हणून गट शिक्षण अधिकारी दादाराव मुसदवाले, तेली समाजाचे जेष्ट नेते दादा जम्मन व्यवाहारे, प्रातिक तैलीक महासभेचे महिला आघाडी बुलडाणा जिल्हाध्यक्ष सुषमाताई राऊत, श्री संताजी सेवाभावी संस्थेचे सचिव सुधाकर रायमूल, आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना इंगळे म्हणाले की, लेखन, वाचन, अंकगणित यांचे व्यावहारिक शिक्षण संताजींना घरच्या घरी मिळाले. त्यांना तल्लख स्मरणशक्तीची देणगी लाभलेली होती.
त्रिगुणात्मक तिळाच्या घाण्यावर बसून संताजी तेल गाळण्या बरोबरच ईश्वरभक्ती करायला लागले होते. तसेच आज रोजी संताच्या माहिती साठी अभ्यासीका उभरण्याची गरज आहे. येधाया काळात अश्या अभ्यासीका उभरण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. ते पूर्ण करण्यासाठी सर्वांची मदत लागणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गटशिक्षण अधिकारी दादाराव मुसदवाले यांनी केले. यावेळी पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.