शिर्डी - तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे तेली यांच्या जयंती निमि त्त शिर्डी येथील वाचनालयात तेली समाजाचे सदगुरू श्रेष्ठ संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती साजरी करण्यात आली. शिर्डी शहरातील जेष्ठ सम जि बांधव व प्रगतशील शेतकरी हभप यशवंतराव वाघचौरे यांचे हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले यावेळी बोलताना तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष विक्रांत वाकचौरे म्हणाले की सर्व समाजाने एक विचाराने समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी व विकासासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे सांगितले सम जाचे संघटन असणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी आपल्या भाषणात व्यक्त केले वाकचौरे पुढे म्हणाले की आज मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत स्पर्धा वाढत असताना या अडचणीला सामोरे जात असताना समाजातील तरुणांचे संघटन काळाची गरज असल्याचे यावेळी वाकचौरे म्हणाले शिर्डी शहर अध्यक्ष दीपक चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले, या कार्यक्रमा प्रसगी दिपक चौधरी यांनी तेली समाजाच्या वतीने समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे व त्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण कायम काम करत राहणार असुन समाजाचे संघटन मजबूत करणार असल्याचे सांगितले तर शिर्डी शहरातील व्यापारी व जिल्हा निरीक्षक बद्रिनाथ लोखंडे यांनी संताजी महाराज जगनाडे यांच्या कार्याचा गौरव वाढावा, संतकार्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी पुढील वर्षी पासून भव्य दिव्य किर्तनसोहळा शिर्डीत आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी श्री हभप इंदोरीकर महाराज देशमुख यांची उपस्थिती लाभणार असल्याचे सांगितले, यानंतर शिर्डी शहर कार्याध्यक्ष सोमनाथ महाले यांनी सर्वांचे आभार मानले,
यानंतर विठ्ठल मंदिर येथे श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या मुर्तीस दूध अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी शिर्डी शहरातील समाजबांधव व जिल्हा सह प्रसिद्धी प्रमुख शशिकांत महाले, राजू पडासवान, राजेंद्र चौधरी, महेश मगर, ज्ञानेश्वर वाघचौरे, हरीश लुटे, रवींद्र महाले, अंजली कोते , दिलीप राऊत, तसेच शिर्डी शहर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.