गडचिरोली : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.अनेक संतांनी समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले. संत संताजी जगनाडे महाराजांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी आहेत. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला, असे प्रतिपादन विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य डॉ. रमेश पिसे. सहयोगी प्रा. डॉ.विवेक जोशी उपस्थित होते. डॉ. रमेश पिसे म्हणाले, माणसाने स्वतःला कसे प्रगल्भ ठेवायला हवे. आपल्या जीवनाचा मतितार्थ काय आहे? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. माणूस विकसित झाला तर समाज विकसित होतो आणि मग देश विकसित होतो. जगनाडे महाराजांचे मूल्य, विचार एका पिढीपासन दसऱ्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. नरेश मडावी, तर आभार प्रा. डॉ. सत्यनारायण सुदेवाड यांनी मानले.