नागपूर : श्री संताजी स्मारक समितीद्वारे संत जगनाडे चौक नंदनवन नागपूर येथे ८ डिसेंबरला मोठ्या उत्साहात श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. जगनाडे महाराज यांचा ३९७ वा जन्मोत्सव ब्रह्ममुहुर्तावर सकाळी ६ वा. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. यशवंत खोब्रागडे व डॉ. गणेश मस्के यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पंचामृताने स्नान करून विधिवत पूजा करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भावातील शासकीय नियमावली विचारात घेऊन समितीचा सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण केले.
रोड आरक्षण रद्द करण्याची मागणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची समाधी पुणे येथील चाकण जवळ सदंबरेला असून समाधी स्थळावर संस्थेची ५ एकर जागा आहे. या जागेतून १८ मीटर डी.पी. रोडचे आरक्षण शासनाने केले आहे. त्यामुळे समाधी स्थळाचे विद्रुपीकरण होईल करिता शासनाने ठरविलेले आरक्षण त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी कार्याध्यक्ष डॉ. यशवंत खोब्रागडे यांनी समितीतर्फे केली. जन्मोत्सव सोहळ्यात समिती सचिव अनिल ढोबळे, कैलास गायधने, चंद्रशेखर खते, हर्षद बेले, डॉ. गोपाल वाघमारे, डॉ. राम कोल्हे, डॉ. गुंजन देशमुख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.