जवळे : संताजी जगनाडे महाराज यांची ३९७वी जयंती पारनेर तालुक्यातील जवळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. ज्येष्ठ नागरिक मदन कृष्णाजी रत्नपारखी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्या सोनाली संदीप सालके म्हणाल्या, जो समाज आपल्या थोर महापुरुषांचा इतिहास विसरतो तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाही. श्री संताजी जगनाडे महाराज यांनी फक्त एका समाजासाठी नाही तर सर्व समाजांसाठी कार्य केले. तिळवण तेली समाजाने श्री संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन चरित्र भविष्यातही येणाऱ्या पिढीला माहिती व्हावे, यासाठी शासनाकडे असा आग्रह धरावा. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये जगनाडे महाराजांचे जीवन चरित्र असावे, अशी मागणी त्यांनी केली.
पारनेर तालुका तिळवण तेली समाज उपाध्यक्ष शिरीष शरद शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच अनिता सुभाष आढाव, उपसरपंच गोरख शिवाजी पठारे, सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे, बाळासाहेब पठारे, लहू सालके, काळू साळवे, प्रकाश बडवे, संदीप शिवाजी सालके, संतोष मारुती सालके, विनायक शेलार, बाळासाहेब शेलार, बबन शेलार, माधव शेलार, बाळासाहेब शेजूळ, सुनील रत्नपारखी,सतीश लोखंडे,राहुल करपे, महेश शेलार, उमेश शेलार, अक्षय शेलार, ऋषिकेश शेलार, सुवर्ण विनायक शेलार, वैशाली गणेश शेलार, धर्मनाथ विद्यालयातील शिक्षक संतोष जाधव, समीर काळे, अभिजीत जाधव, अण्णासाहेब सरोदे उपस्थित होते.