भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
तेली गल्लीचे देशमाने :- कोणते देशमाने ? तेलीगल्लीचे देशमाने हे समिकरण रूढ झालेले देशमाने म्हणजे एकखांबी तंबू ! शिक्षक असलेला हा माणूस सुट्टी व रविवार पाहुन प्रवास करून समाज पिंजला. निवडक सुयश अशा बातम्यांपेक्षा तैलिक प्रबोधनास सर्वोच्च प्राधान्य मुळात समाज सेवेची गोडी दिली वाईचे तत्कालीन सााजिक नेते कै. रामचंद्र मेरूकर यांनी मार्गदर्शन दिले. 1983 ला तेली गल्ली सुरू केले. प्रारंभीच्या काळात वर्गणीदार मिळेनात एकदा तर दिवाळी अंकाचे बील थकले ! बायकोचे दागीने गहाण ठेवून त्यांनी बील दिले. मोफत वधुवर अंक प्रसिद्धी करण्याची परंपरा आजही चालु ठेवली 15 वर्गणीदारांव सरू केलेल या अंकाचे आता 1100 वर्गणीदार आहे. संताजी चरित्र लिहुन मोलाची कामगिरी केली. त्यांच्या 9 आवृत्या संपल्या ओबीसी चळवळ व अभ्यासक यात अग्रेसर ! मराठ कुणबी हे खोटे ओबीसी विरोधात सध्या चळवळीत झोकून दिले. तेली समाजातील स्वातंत्र्य सैनिकांचा परिचय करून देण्याबरोबरच संताजी पालखी सोहळ्यास प्रोत्साहन दिले पश्चिममहाराष्ट्र तैलिक जागृतित मोलाचे योगदान म्हणुन त्याच्या कार्याचे मोजमाप करावे लागेल.