राहाता : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी असून संतांनी कधीही कोणत्या एका समाजासाठी काम केले नाही. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला, असे मनोगत राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी राहाता नगरपालिकेत बोलताना व्यक्त केले.
तेली समाजाचे आराध्य दैवत संत जगनाडे महाराज यांची राहाता नगरपालिकेत जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, गटनेते विजय सदाफळ, दास आप्पा लुटे, अमित महाले, दत्तु लुटे, सचिन लोखंडे, शिवाजी लुटे, भाऊसाहेब नागले, माधुरी लुटे, वैशाली लुटे, प्रगती खंडागळे, पुनम लुटे, नुतन महाले, अनिता लुटे शैला लुटे आदी भगिणी उपस्थित होत्या.
यावेळी जगनाडे यांनी घाण्यावरील अभंगांत अध्यात्माचे रूपक मांडले आहे. 'मनुष्याचा देह म्हणजे घाणा' असे रूपक मांडून त्यांनी अभंगरचना केली. मानवी देह हा घाणा असेल तर त्यातून निघणारे तेल हे चैतन्य आणि सुविचारांचे तेल आहे. अशी मांडणी त्यांनी आपल्या अभंगांतन केली. असे म्हणतात की, संत संताजी जगनाडे यांच्यामुळेच संत तुकारामांच्या गाथा आपल्यापर्यंत पोहोचल्या. त्रिगुणात्मक तिळाच्या घाण्यावर बसून संताजी तेल गाळण्याबरोबरच ईश्वरभक्ती करायला लागले होते. कर्मकांडाचा फोलपणा त्यांनी लोकांसमोर मांडला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी असून संतांनी कधीही कोणत्या एका समाजासाठी काम केले नाही. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. आज समाजात घडत असलेल्या अनुचित घटना लक्षात घेता समाजाला खऱ्या अर्थाने संत विचारांची गरज आहे.
यावेळी उपस्थित सर्व समाज बांधव व भगिनिनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमास तेली समाजाचे बांधव उपस्थित होते.