अहमदनगर : संतांचे विचार है आपले जीवन सुखी करण्यासाठी निर्माण केले गेले आहे. त्यांचे विचार आचरणात आणून आपण आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे. संत श्री जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शक तत्वावर तिळवण तेली समाज ट्रस्ट काम करुन समाजोन्नत्तीचे काम करत आहे. विविध उपक्रमातून समाजाची प्रगती साधत आहे. या कार्यात प्रत्येकाने योगदान दिल्यास एक चांगला समाज निर्माण होईल. यासाठी आपणही सहकार्य करु, असे प्रतिपादन मनपाचे माजी स्थायी समिती सभापती सचिन जाधव यांनी केले.
तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त दाळमंडई येथील मंदिरातील मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती सचिन जाधव, माजी नगराध्यक्ष आसाराम शेजूळ, अँड. विनायक दारुणकर, ट्रस्टचे अध्यक्ष सागर काळे, उपाध्यक्षा सौ.निता लोखंडे, विश्वस्त प्रसाद शिंदे, गोकूळ कोटकर, मनोज क्षीरसागर, अशोक डोळसे आदि उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शेजूळ म्हणाले, तिळवण तेली समाज ट्रस्टच्या उपक्रमाने समाज जोडण्याचे काम केले आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्व घटकांची उन्नत्ती साधत आहे. प्रास्तविक प्रसाद शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अशोक डोळसे यांनी केले तर आभार मनोज क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रमास ट्रस्टचे विश्वस्त सचिन शेंदूरकर, प्रकाश सैंदर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, शोभना धारक आदिंनी परिश्रम घेतले.यानिमित्त सहा गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे परिक्षक म्हणून अशोक डोळसे, नंदकुमार देशपांडे, विनायक सापा, विवेक भारताल, सौ.अनामिका म्हस्के, सौ. हर्षदा डोळसे, सचिन घोडे आदिनी केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.