नंदुरबार येथील कन्या असलेल्या प्रसिध्द उद्योजिका तथा झेप फाऊंडेशन व भारताच्या ग्लोबल वेलनेसच्या राजदूत डॉ.रेखा चौधरी यांनी लिहिलेल्या इंडिया एन्शेंट लेगसी ऑफ वेलनेस या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच डॉ.रेखा चौधरी यांच्या लिखीत पुस्तिकेची पंतप्रधानांच्या ट्रिटर टीमने दखल घेतली आहे.
भारताच्या ग्लोबल वेलनेसच्या राजदत डॉ.रेखा चौधरी यांनी आदिवासी समाजावर आधारीत निरोगीपणाचा भारतीय प्राचिन वारसा असे पुस्तक लिहिले आहे. जागतिक डिजीटल डिटॉक्स दिनाचे औचित्य साधुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते रेखा चौधरी लिखीत इंडिया एन्शेंट लेगसी ऑफ वेलनेस या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी रेखा चौधरी यांचा गावापासून ग्लोबल प्रवास पाहुन अभिमान असल्याचे सांगुन कौतुक केले. डॉ.रेखा चौधरी या ज्येष्ठनेते हिरालालकाका चौधरी यांच्या कन्या तर हिरा उद्योग समुहाचे चेअरमन प्रा. डॉ. रविंद्र चौधरी व माजी आ. शिरीष चौधरी यांच्या भगिनी आहेत. या सोहळ्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मिता ठाकरे (सामाजिक आणि मनोरंजन उद्योजक ऑफ दि इयर), अर्चना नेवरेकर (महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ता व मराठी उद्योग), निशा जामवाला (वर्षातील सर्वोत्कृष्ट ब्रेन्ड सल्लागार), विकास मित्तल (बिझनेस आयकॉन ऑफ दि इयर), रितु दत्ता (वर्षातील सर्वोत्कृष्ट सामाजिक व्यक्तीमत्व), आहना कुमरा (वर्षातील फिट अभिनेत्री), पियुष जयस्वाल (महिला सक्षमीकरणाचे बदल निर्माता), सिमरन आहुजा (वर्षातील सर्वोत्कृष्ट एएमसीईई), स्मिता जयकर (उत्तम अध्यात्मिक तज्ञ गुरु) यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.