श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस 28 वर्षे पूर्ण झाली. संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातून व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रतिवर्षी प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे, दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना 12 लाख रुपये पर्यंत रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 500 विद्यार्थ्यांना 1 कोटी, 35 लाख रुपयांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले. दरवर्षी आम्ही हे प्रसिद्धीपत्रक छापील स्वरूपात महाराष्ट्रातील प्रत्येक सामाजिक संस्थांना पोस्टाने अथवा कुरियरने जुलै महिन्यातच पाठवत असतो. यावर्षीही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया उशिरा झाल्यामुळे हे पत्रक आपणांस उशिरा व अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देत आहोत.
प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्राच्या विविध भागातून खालील प्रकारच्या शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
1) वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक शास्त्र, व्यवस्थापन शास्त्र इ. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
2) केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या Common Entrance Exam for All India Services साठी IAS, IPS इ. उच्च श्रेणीच्या पदांसाठी होणाऱ्या प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होऊन अंतिम निवडीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार.
3) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यस्तरीय प्रथम श्रेणीच्या (Deputy Collector/Dy. S. P./Dy. Registrar इ.) प्राथमिक परिक्षातील उत्तीर्ण विद्यार्थी.
4) भौतिक (Physics), रासायनिक (Chemistry), गणित (Mathamatics) अथवा संशोधनात्मक (Phd.) अभ्यासक्रम स्वीकारलेले विद्यार्थी.
5) चार्टर्ड अकाउंटंट (CA), कॉस्ट अकाऊंटंट (ICWA), चार्टर्ड फायनान्स ऍनालिसिस्ट (CFA), कंपनी सेक्रेटरी (C.S.), हुमन रिसॉरसिस (H.R.D.) इ. अभ्यासक्रमाची प्राथमिक चाचणी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
6) महाराष्ट्रातील ख्यातनाम महाविद्यालयात कमर्शियल आर्ट, फाईन आर्टस् इ. च्या विविध शाखांत प्रवेश मिळवून पदवी/पदविका अभ्यासक्रम स्वीकारलेले विद्यार्थी.
प्रतिवर्षी प्रमाणे वरील विषयांपैकी क्र. 1 द्वारे येणाऱ्या अर्जाची छाननी करून निवड झालेल्या विद्यार्थ्यास वार्षिक रु 10,000/ या प्रमाणात शिष्यवृत्ती दिली जाईल व त्या विद्यार्थ्याने आपला शैक्षणिक स्तर समाधानकारक राखल्यास त्याला, त्याच्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाईल. क्र. 2 ते 6 मध्ये निर्देशिलेल्या अभ्यासक्रमासाठी आलेल्या अर्जाची छाननी झाल्यानंतर त्यांनी निवडलेला
अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, त्यासाठी लागणारी आर्थिक गरज व _ विद्यार्थ्याची आर्थिक निकड या सर्व बाबींचा फौंडेशनच्या शिक्षणतज्ज्ञ व मार्गदर्शक यांच्या विचारविनिमयाने शिष्यवृत्तीची रक्कम व कालावधी निश्चित केली जाईल व ती रक्कम विद्यार्थ्यास दिली जाईल.
सदर निवड फौंडेशनच्या शिक्षण समितीमार्फत निःपक्षरित्या केली जाते. निवडीबाबतचा समितीचा निर्णय अंतिम समजून त्याप्रमाणे शिष्यवृत्ती वाटपाची कार्यवाही केली जाते.
अर्जाची प्राथमिक छाननी द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपर्क साधून मुलाखत घेतली जाऊ शकते. त्यानंतर अंतिम निवड करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने अर्जात नमूद केलेल्या ठिकाणी स्वतःचा व्हाट्सएप नंबर ईमेल ऍड्रेस इ. सविस्तर माहिती देणे अत्यावश्यक आहे.
आपल्या परिसरातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपल्या विभागातील गरजू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीची माहिती व्हाट्सऍपद्वारे जरूर द्यावी ही विनंती.
आपले अर्ज स्पीडपोस्टानेच पाठवावेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15-02-2022.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरून पाठवण्याचा पत्ता-- द्वारा: श्री प्रभाकर संतू कोते - विश्वस्त बी- 26, श्री सद्गुरू को-ऑप. हौ. सोसा. 90 फूट रोड, भांडूप गाव, भांडूप (पूर्व), मुंबई 400042 मोबाईल नंबर 9821431718
आपले स्नेहांकित डॉ. शाम गेनूजी शिंदे (चेअरमन) शंभू मुरारी तेली (मॅनेजिंग ट्रस्टी)