उस्मानाबाद, दि. १७ - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियान रथ यात्रेतील संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची मुर्ती, संताजींच्या पादुका, हस्त लिखीत गाथा यांचे पूजन तुळजापूर नगरीत आई तुळजाभवानीच्या महाद्वार येथे संताजी जगनाडे महाराजांचे ११ वे वंशज गोपाळशेट जगनाडे व बाळासाहेब काळे, तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने, जिल्हाध्यक्ष रवी कोरे, राज्य समन्वयक सुनिल चौधरी, सेवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुभाष पन्हाळे, विभागिय अध्यक्ष डॉ. रावसाहेब राऊत, सचिन राऊत, अदिनाथ ठेले, लोहारा तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे, उमरगा तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी, तुळजापूर येथिल समाज बांधवाच्या वतीने करण्यात आले.
उस्मानाबाद शहरात आ. कैलास घाडगे - पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, बारा बलुतेदार संघाचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ घोडके, दत्ता बंडगर, नगर परीषदेचे गटनेते सोमनाथ गुरव, डीसीसी बँकेचे संचालक भारत डोलारे यांनी रथाचे स्वागत करून संताजी जगनाडे महाराजांच्या मुतीचे पूजन केले. यानंतर या अभियानाचे प्रास्ताविक करताना रवी कोरे म्हणाले, राज्यातील समस्त तेली समाज बांधवांशी हितगुज करून त्यांच्या समस्या समजुन घेऊन त्यावर मार्गदर्शन व निवारण करण्यासाठी ही रथ यात्रा सुरू आहे. समाजात जनजागृती करण्यासाठी रथ यात्रेसोबत आलेले मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत असे सांगितले.
नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले, संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य समाजापर्यंत पोहचविण्यासाठी जे कार्य सुरू आहे ते कौतुकास्पद आहे. तसेच या अभियाना मार्फत समाजातील अडीअडचणी सोडविल्या जात आहेत. संताजींचे विचार हे तळागाळा पर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. या अभियाना मार्फत सुरू असलेल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यानंतर आ. कैलास पाटील म्हणाले, संताजी जगनाडे यांच्या कार्याचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे व सर्वोतपरी प्रयत्न करून स्वतः मुख्यमंत्री यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याचेआस्वाशित केले. तसेच खादी ग्राम उद्योग मधुन तेली समाजातील व्यवसायिकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले.
कार्यक्रमास अँड. विशाल साखरे, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, जि. प. सदस्य नितिन शेरखाने, महादेव मंगले, लक्ष्मण निर्मळे, आबासाहेब खोत, सतिश कदम, शिवानंद कथले, संजोग पवार, दिपक पवार, मुकेश नायगावकर, अॅड. खंडेराय चौरे, पिराजी मंजुळे, दाजीप्पा पवार, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्तात्रय बेगमपुरे, सतिश लोंढे, रमेश साखरे, दिपक नाईक, जितेंद्र घोडके, नागेश निर्मळे, गणेश खबोले, प्रमोद बंगले. नागेश बंगले, राजकुमार अंबुसे, शिवकुमार दळवी, बाबुराव कलशेट्टी, इंद्रजित म्हेत्रे, महेश कलशेट्टी उपस्थित होते.