संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुण्याजवळील मावळ तालुक्यातील चाकण येथे सन १५४५ रोजी झाला. एका वारकरी संप्रदायी असलेल्या विठोबा जगनाडे आणि आई मथुबाई यांना पुत्ररत्न झाले. महाराजांचे वडील विठोबा यांचा व्यवसाय तेल घाण्याचा होता. संताजी १० वर्षांचे झाले आणि वडील विठोबा यांनी तेलधंद्याचा परिचय करून द्यायला सुरुवात केली शिक्षण तसे फारसे नव्हते . लिहिता वाजता येईल, व्यवसायातील हिशोब ठेवणे एवढेच होते. त्यावेळच्या रीतीरिवाजाप्रमाणे त्यांचे लग्न वयाच्या दहाव्या वर्षी यमुनाबाई सोबत झाले. संताजींना कथा कीर्तनाची खूप आवड होती आणि अशाच दिनक्रमात बारा वर्षे निघून गेली.
एके दिवशी तुकाराम महाराजांच्या कीर्तनाची बातमी गावागावात पोहोचली. संताजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात खूप तल्लीन झाले. त्यांनी तुकाराम महाराजांचे बोट धरून सोबत चालण्याचा निर्णय घेतला. मग तिथे संताजी महाराजांनी तुकाराम महाराजांना वचन दिले की, मी कधीच संसाराकडे दुर्लक्ष करणार नाही, पण मला तुमच्या छत्रछायेखाली घ्यार. तकाराम महाराजांच्या १४ टाळक-यांपैकी संताजी महाराज प्रमख होते. तुकाराम महाराजांचे अभंग लिहून ठेवण्याचे काम संताजींनी केले. तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले.
तुकाराम महाराजांच्या नंतर संताजी महाराज यांनी आपल्या पिढीजात व्यवसायाबरोबर तुकाराम महाराजांच्या अभंग -ओव्या जपून ठेवल्या व त्यांची पूजाअर्चा करू लागले. पुढे काही दिवसांनी संताजी महाराजांची पत्नी यमुनाबाई बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. संताजींचे वडील अगोदरच स्वर्गवासी झाले होते. आई मथुबाई वृद्धापकाळात आपल्या माहेरी सदुंबरे येथे गेली होती. संताजी महाराज वाड्यात एकटेच होते. चाकणच्या भुईकोट किल्ल्याला शाहिस्तेखानाच्या फौजेने वेढा दिला. त्यांनी संताजी महाराजांच्या घरावर कब्जा करून सोनं-नाणं सर्व लटले, तेव्हा संताजींनी त्यांच्या तावडीतून सुटून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या लिखित स्वरुपामधील गाथा अभंग सोबत घेऊन आपल्या मामाच्या गावी सदुंबरे येथे आले. तिथे त्यांना आपल्याला पुत्ररत्न झाल्याची बातमी कळली. काही दिवसांनी आजारपणामुळे आईचे निधन झाले. अशा परिस्थितीत खचून न जाता तुकाराम महाराजांच्या विचारांची परंपरा चालू ठेवली आणि किर्तन करू लागले.
तुकाराम महाराजांच्या अभंग - गाथांचा प्रचार करत करत आपले काम निःस्वार्थीपणे चालू ठेवले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचे निधन आपल्या मामाच्या गावी सदंबरे येथे झाले. जनसागर लोटला. सवानी मुठ माती देऊन सुद्धा संताजींचा चेहरा झाकला जात नव्हता, कारण तुकाराम महाराजांनी मुठ माती दिल्यावर वैकुंठवासी प्रस्थान करणार असे वचन तुकाराम महाराजांनी संताजींना दिले होते. आणि साक्षात्कार झाला. स्वयं तुकाराम महाराज तिथे प्रकट झाले. त्यांनी संताजींना मुठ माती दिल्यावर त्यांचा चेहरा झाकला आणि त्याच ठिकाणी सदंबरे येथे त्यांचे समाधी मंदिर आहे. तेली समाजाचे समाजसेवक श्री दिलीप खोंड मुंबई यांनी सर्वांनी जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे