संताजी महाराजा-येई आमुच्या काजा-पाहती वाट भक्त-तुचि संताचा राजा ॥धृ॥
पुणे ही जिल्हयात एका चाकण गांवी-विठोबा मथाबाई-विठचरणी माथा ठेवी
ऐशा भक्ता पोटी आपण जन्माला याजा-संताजी महराजा-येई भक्ताच्या काजा ॥१॥
माता पिता करी धंदा-गाळी तिळाचे तेल-भक्तिमार्ग हाचीबरा-चढे झाडावरी वेल
ऐशा तुकासंगे-होता तुमचा साजा-संताजी महाराजा-येई भक्ताच्या काजा ।।२।।
तुका करी अभंग-गड भंडार वरी-तयाचे अभंग आपण लेखन करी
अभंग गायेने-भक्ता अमृत पाजा-संताजी महाराजा-येई भक्ताच्या काजा ।। ३ ।।
अभंग गाथा हो आहे भगवत गिता संसार सागरात तिच आम्हाला त्राता
स्वाद घ्याहो सारे बंध येते कैशी मौजा-संताजी महाराजा-येई भक्ताच्या काजा ।। ४ ।।
मानवाचे शत्रु होते तेचि त्रास तुज देत-अभंग गाथा ही बुडविली डोहात
ऐशा दुष्ट जना देव देतो मग सजा-संताजी महाराजा-येई भक्ताच्या काजा ॥५॥
सर्व मानव बंधु नका करू कोणी हेवा-भक्तिरस प्यारे सारे-भाव देवावरी ठेवा
तारक तोचि एक येई संकटी काजा-संताजी महाराजा-येई भक्ताच्या काजा ॥ ६ ॥
ऐसा हा संताजी संत आमुच्या मनी-भक्ती ती करण्याला धरू त्याच्या चरणी
कृपा करी संताजी आम्हा शक्ती युक्ती द्याजा-संताजी महाराजा-येई भक्ताच्या काजा ॥७॥
शक्ती युक्ती बुध्दी देई-आमच्या समाजाला-आरती ओवाळितो भक्त आहे साधाभोळा
एकीचे बल देई संतु आमच्या समाजा-संताजी महाराजा-येई भक्ताच्या काजा ।।८।।
रचियता स्व.श्री द.स.तलमले गरूजी
गणेश पेठ, नागपूर