नगर - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक सभेच्यावतीने ओबीसींवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. जातीमधील सर्व पोटजाती विसरुन तेली समाजासह ओबीसी समाज संघटन मजबूत व्हावे हे काळानुरुप गरजेचे आहे. प्रांतिक तैलिक महासभेच्या तेली समाजाच्या अॅपद्वारे समाजाची महाराष्ट्रभर जनगणना व्हावी व समाजाचा डाटा गोळा करणे गरजेचे आहे. तसेच ओबीसींवरील होणार्या अन्यायाबाबत वेळप्रसंगी समाज रस्त्यावर उतरेल. सुप्रिम कोर्टाने 27 टक्के आरक्षण नाकारले असून, त्यासाठी इंम्पिरिकल डाटा देण्याची मागणी केली आहे. ओबीसींमध्ये जागृती व्हावी, हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ओबीसी समाजामध्ये जागृती व्हावी आणि जागृत झालेल्या समाजाने स्वत:च्या हक्कासाठी न्यायासाठी व अधिकारांसाठी लढा उभारावा, या भुमिकेतून समाज जोडो रथयात्रा व ओबीसी जनजागर अभियान महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने सुरु केले आहे. या ओबीसी लढ्यात समाजातील तरुणांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केेले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियानांतर्गत श्री संत संताजी महाराज यांची रथयात्रा विविध जिल्ह्यातून नगर येथे आली.या यात्रेचे उत्स्फुर्त स्वागत नगर शहरातील समाज बांधवांकडून करण्यात आले.याप्रसंगी हरिभाऊ डोळसे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.रामदासजी तडस, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश महासचिव डॉ.भुषण कर्डिले, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष आ.संदिप क्षीरसागर, महासचिव नरेंद्र चौधरी, सेवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सुभाषजी पन्हाळे, राज्य समन्वयक सुनिल चौधरी, श्री संताजी महाराजांचे 11 वे वंशज गोपाळशेठ जगनाडे, मोहनलाल चौधरी, विठ्ठल बावरे आदि उपस्थित होते.
दाळमंडई येथील तेली पंचाचा वाडा, येथे रथयात्रा आली असता, श्री विठ्ठल-रुख्मणीस महाआरती करण्यात आली. रथयात्रेतील भाविकांचे तेली समाज बांधवांच्यावतीने स्वागत करण्यात आले. या रथयात्रेत संताजी महाराजांची मूर्ती, पुजा पादुका, श्री संताजी महाराजांनी लिहिलेली हस्तलिखित गाथाच्या दर्शन घेण्याचा योग प्रत्यक्ष प्राप्त होऊन आदर्श घेत राहील. रथयात्रेचा नगरमध्ये 12 वा दिवस होता.रथयात्रेच्या दर्शनाकरीता तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरमधील यात्रा यशस्वीतेसाठी महानगर अध्यक्ष रमेश साळूंके, सचिव विजय दळवी, कोषाध्यक्ष कृष्णकांत साळूंके, प्रकाश सैंदर, दत्तात्रय करपे, गोरख व्यवहारे, हभप रामदास महाराज क्षीरसागर, श्रीकांत सोनटक्के, सुरेशराव देवकर, चंद्रकांत लोखंडे, सचिन म्हस्के, रावसाहेब देशमाने, देवीदास साळूंके, श्रीराम हजारे, गोकूळ शिंदे, चंद्रकांत आंबटकर, धनबर सर, कैलासराव करपे, देवीदास ढवळे, माधवराव ढवळे, युवा आघाडी अध्यक्ष गणेश धारक, संदिप भागवत, उमाकांत डोळसे, कालिदास क्षीरसागर, चेतन डोळसे, चंद्रकांत भागवत, पवन साळूंके, शुभम भोज, गोकूळ कोटकर, दत्ता डोळसे, प्रसाद शिंदे, शशिकांत देवकर, बाळासाहेब जुंदरे, मनोज क्षीरसागर, सागर काळे, उमेश काळे, अनिल धोत्रे, प्रमोद डोळसे, नागेश भागवत, राजू दारुणकर, राजू म्हस्के, सुरेश देशमाने, वैभव शिंदे, योगेश भागवत, गणेश दहितुले, अनिल देवराव, अबांदास भगत, परसराम सैंदर, लक्ष्मण डोळसे, किशोर काळे, कानिफनाथ मानुरकर, लक्ष्मण देवकर, कैलास दारुणकर, गणेश म्हस्के आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.