औरंगाबाद संताजी जगनाडे महाराज यांची हस्तलिखित गाथा, पादुका व मूर्ती ठेवलेली रथयात्रा मंगळवारी (२१ डिसेंबर) शहरात दाखल झाली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतर्फे समाज जोडो रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे येथून निघालेली यात्रा राज्यभर जनजागृती करीत आहे. औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
रथयात्रा १४ जानेवारीपर्यंत राज्यभर जाणार आहे. रथयात्रेचे आयोजन महासभेचे राज्य अध्यक्ष रामदास तडस, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, कार्याध्यक्ष असोक व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन शेलार, प्रदेशाध्यक्ष सुभाष पन्हाळे, डॉ. भूषण कर्डिले, आ. संदीप क्षीरसागर आदींच्या नेतृत्वाखाली केले आहे. शहरात महात्मा फुले चौकातून निघालेली यात्रा औरंगपुरा, क्रांती चौक, आकाशवाणी येथील स्वामी बसवेश्वर पुतळ्यास 'अभिवादन करून सिडको बसस्थानक चौकातून चिकलठाणा येथे मार्गस्थ झाली. रथयात्रेचे चौकाचौकात स्वागत करण्यात आले. रथयात्रेत तैलिक महासभेचे प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, राज्य संघटक अनिल मकरिये, मराठवाडा विभागीय अध्यक्ष नीलेश सोनवणे, मराठवाडा सचिव गणेश पवार, संघटक प्रवीण वाघलव्हाळे, शहराध्यक्ष धोंडिराम वाळके, अनिल क्षीरसागर, संजय अंबेकर, बाळासाहेब पवार, जयश्री वाघ, संताराम वाळके, सुरेश मिटकर, नारायण दळवे, भागीनाथ कर्डिले, कपिल राऊत, महेंद्र महाकाळ, तेजस मकरिये, राहुल मगर, भिकन राऊत, सुनील क्षीरसागर, संतोष सुरळे, राजू राऊत, धनराज खंडागळे, मनोज सोनवणे, कचरू वेळंजकर, ईश्वर पेंढारे, कृष्णा पेंढारे, गोपाळ सोनवणे, लक्ष्मी महाकाळ आदींचा सहभाग होता.