कसबेडिग्रज : शासनाकडून ओबीसीचे आरक्षण रद्द केले आहे. आता ते फक्त निवडणुकीपुरते मर्यादित असले तरी यापुढे सर्व क्षेत्रातील आरक्षण रद्द होण्याची चिन्हे आहेत. तेव्हा असंघटित लोकांवर अन्याय होईल. यापुढे ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे महत्त्वाचे आहे, म्हणूनच संघटित लोकच यापुढे सुलभ पद्धतीने जीवन जगतील, असे मत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी व्यक्त केले.
संत संताजी जगनाडे महाराजांच्या रथयात्रा समाज जोडो ओबीसी जनजागरण अभियानानिमित्ताने मार्गदर्शक सभेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, राज्य समन्वयक सुनील चौधरी, नरेंद्र चौधरी, पोपटराव गवळी, प्रदेशाध्यक्ष संजय विभूते, पश्चिम महाराष्ट्र सेवा आघाडी अध्यक्ष नागेश तेली, राज्य सचिव नीलेश संपकाळ, उपसचिव शांताराम देशमाने, जिल्हाध्यक्ष शशिकांत फल्ले, बाळासो कुंभार, पोपटराव भोज, विलासराव क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी सांगली जिल्हा तेली समाज संघटना बंधू-भगिनींनी श्रीसंत संताजी जगनाडे यांच्या पादुकांचे व गाथा ग्रंथाचे स्वागत केले. स्वागत जिल्हाध्यक्ष शशिकांत फल्ले यांनी केले. पाहण्यांचापरिचयनीलेशसंपकाळ यांनी केला. प्रास्ताविक संजय विभूते यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेश तेली यांनी आभार मानले. यावेळी प्रकाश शिणगारे, डॉ. संजय गाताडे, संजय विभूते, बाळासो इंगळे, कैलास देशमाने, गणेश चरणकर, रघुनाथ उबारे, उमेश कोरे, महालिंग हिंगे, रामचंद्र देशमाने, अरविंद वाळवेकर, लतिका हुंडरगी, पुष्पाजंली कोरे उपस्थित होत्या.