पुसद : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज याची पालखी रथ यात्रा व प्रांतिक संघटनेचे नेते हे यवतमाळ येथे दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी गुरुवारला सायंकाळी ६.०० वाजता प्रथमागमन करणार आहेत. या पालखी रथाचे व अतिथी नेत्याचे स्वागत लोहारा येथील श्री कमलेश्वर महादेव मंदिरात भव्य स्वरूपात करण्यासाठी समाज बांधवानी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे यवतमाळ पालखीचा व समाज नेत्यांचा मुक्काम संताजी मंदिर येथे राहील. २४ डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी पालखी व प्रतिमेचे अभिषेक पुजन होईल. त्यानंतर प्रातिकतेचे नेते खा. रामदास तडस व अन्य नेते संताजी मंदिरात आयोजित सभेत समाज बांधवांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती प्रातीक तेली महासभेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दिलीप बारडे या पत्रकार परिषदेत केली आहे.
दि. २४ डिसेंबरला प्रांतिक नेत्यांच्या स्वागत सभेत खा. रामदास तडस कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, महासचिव डॉ. भूषण कर्डीले, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, युवा अध्यक्ष संदिप क्षिरसागर, सेवा आघाडी सुभाष पन्हाळे, उपाध्यक्ष बापू विभूते, ठाणे विभाग अध्यक्ष सुनिल चौधरी, युवा आघाडी महासचिव नरेंद्र चौधरी हे प्रदेश कार्यकारीनी नेते उपस्थित राहतील. पालकीरथ यात्रेच्या निमित्य यवतमाळ येथील तेली समाजाचे मान्यवर सेवेकरी व नेत्यांना शुभेच्छा देतील. त्यानंतर १० वाजता महाप्रसाद घेवून पालखी रथ यात्रा श्री क्षेत्र कळंब मानि प्रस्थान करील पालखीला निरोप देण्यासाठी युवकांची स्कुटर रैली, महिला संघटनेच्या वतीने सामुहीक आरती आणि भजनी दिंडीव्दारे निरोप देण्यात येईल. कळंब येथे पालखी रथ यात्रेचे व अतिथिचे स्वागत तेली युवाकार्यकर्ता रंगरावजी लांजेवार व प्रशांत डेहनकर करतील व कळंब येथे पालखीचा अल्पविधाम असेल तसेच कळंब, राळेगाव व बाभूळगाव तालुक्यातील समाज बांधव कळंब येथे पालखी दर्शन घेतील. देवळीला जाईल.पालखी रथ यात्रा वर्धा जिल्ह्यात पालखीने आराध्य दैवताच्या पालकाचे दर्शन तैलिक बंधु भगिनीस संताजी महाराजांचा इतिहास तसेच महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेने प्रारंभ केलेल्या नविन समाजाची जनगणना व्हावी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लोकावर होणारा अन्याय दूर व्हावा त्या दृष्टीने तैलिक समाजाच्या शिखर संस्थेने जे हे अभियान सुरू करून ही रथयात्रा आयोजित केली आहे हे विशेष. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ही पालखीरथ यात्रा समाज जागति. सामाजिक सुधारणा व संताजी दर्शनार्थ भ्रमंती करीत असून यवतमाळ जिल्ह्यातील महाप्रसाद पालखी रथ दर्शन व नेत्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यवतमाळ जिल्हा प्रांतिक महासभेचे अध्यक्ष अॅड. दिलीपजी बरडे यांनी केले आहे. पालकीरथ यात्रा स्वागत सभा व निरोप समारंभासाठी म. प्रा. तैलिक महासभा जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी सर्वश्री विलास गिरोलकर, विजय बिजुलकर, रमेश जयसिंगपुरे, संजय साहू, सुनिल गुलवाडे, सुमन साखरकर, डॉ. ख्याली गिरोलकर चेतन भुराणे, सुरेश झोपौटे, संतोष डोमाळे हे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. समाज बांधवांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.