श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था - सुदुंबरे विकास कामांचा शुभारंभ
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुंदुबरे या संस्थेची ५ एकर जागा सुदुंबरे येथे आहे. संताजी महाराजांनी श्री. संत तुकाराम महाराजांच्या गाथा जतन करण्याचे मोठे काम केले असल्याने, शासनाने सदर ठिकाणाला तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. शासनाच्या वतीने दरवर्षी निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतू तो निधी रस्ते विकास किंवा अन्य कामासाठी वापरला जातो. संस्थेने सदर जागेचा आराखडा तयार करून शासनास सादर केलेला आहे. त्यानुसार भक्त निवास, सभा मंडप, सिमा भिंत व इतर कामांचा समावेष आहे. परंतु शासनाने सदर कामासाठी अद्याप निधी उपलब्ध करून दिलेला नाही.
नजमा हेपतुल्ला व श्री. दत्ता मेघे हे राज्यसभा सदस्य असतांना त्यांनी दिलेल्या निधीतुन मंदिराचा सभा मंडप व भक्त निवास या इमारतीचे आर. सी.सी बांधकाम पूर्ण केले असुन अद्याप विटबांधकाम, प्लास्टर, व टाईल्स इ. कामकाजासाठी किमान तीस पस्तीस लाखाची आवश्यकता आहे. शासन निधी उपलब्ध करून देत नसल्याने, समाजाने देणगी रूपाने वर्गणी गोळा करून, सदरचे काम पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे.
दिनांक ५/१०/२०१४ रोजी सुदुंबरे येथे मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्र आले होते. विकास कामाचा शुभारंभ या वर्षाचे उत्सव अध्यक्ष श्री. सुरेश जगनाडे चिबंळी यांचे हस्ते सहपत्नीक करण्यात आला. त्या वेळी उत्सव उद्घाटक शैलेश मखामले, तळेगांव दाभाडे, श्री. मुकुंद चौधरी मुंबई, श्री. सतीश वैरागी पनवेल, पुणे शहर तेली समाजाचे अध्यक्ष श्री. विजयकुमार शिंदे, श्री. रमेश भोज, श्री. राजेश येवले, श्री. उल्हास वालझाडे, श्री. अनिलशेठ कहाणे, श्री. भिकाजी भोज, श्री. संदिप चिलेकर, श्री. नारायण पिंगळे , श्री. उद्धव भागवत, श्री. प्रभाकर बारमुख, श्री. कैलास शिंदे, श्री. दशरथ हाडके, पिंपरी चिंचवड शहर तेली समाजाचे कार्याध्यक्ष श्री. पोपटराव पिंगळे, श्री. संजय जगनाडे व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी खालील मान्यवरांनी देणग्या जाहीर केल्या.
श्री. सुरेश मारूती जगनाडे :- महोत्सव अध्यक्ष रू.५,५१,०००/-
श्री. शैलेशा मखामले :- महोत्सव उदघाटक रू. १,००,०००/-
श्री. गोपाळशेठ जगनाडे :- संस्थेचे माजी अध्यक्ष रू. ३,००,०००/-
श्री. राजेंद्र गंगाधर घाटकर :- खजीनदार रू. ५१,०००/-
श्री. आनंद देशमाने :- मा. जिल्हा परिषद सदस्य रू. २५,०००/-
श्री. पनवेल तेली समाज - पनवेल - रू. ११,०००/-
विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी संसथेचे अध्यक्ष श्री. जनार्धन गोपाळशेठ जगनाडे यांनी उर्वरित विकासकामे पूर्ण करणेकामी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असलेले, समाज बांधवांना देणगी रूपाने मदतीचे आवाहन केले. देणगीचा धनादेशा श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे यांचे नांवे देण्यात यावा. धनादेश / डी. डी. हे श्री. जनार्दन गोपाळशेठ जगनाडे अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे मु.पो. चाकण, ता. खेड, जि. पुणे या पत्यावर पाठविण्यात यावा. (मो. नं. ७३५०८७५७५७)
श्री. संताजी महाराजांची पुण्यतिथी सोहळा २० डिसेंबर २०१४ रोजी आहे. सदर पुण्यतिथी सोहळ्यात सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अवाहनही अध्यक्षांनी केले.
दिनांक 20-10-2014 07:04:13