भंडारा : श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पालखी व संत तुकाराम महाराजांच्या गाथा दर्शन सोहळा भंडारा येथील शुक्रवारी वार्डातील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात संपन्न होऊन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
ही शोभायात्रा लाल बहादूर शास्त्री चौक ते गांधी चौक ते राजीव गांधी चौक मार्गे साई मंदिर येथे पालखीचे आगमन झाले. ही शोभायात्रा महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा राज्याध्यक्ष खासदार रामदास तडस, महासचिव डॉ.भूषण कर्डीले, सहसचिव गजूनाना शेलार, माजी आमदार चरण वाघमारे, नरेंद्र चौधरी, सुनील चौधरी, युवा आघाडी राज्य उपाध्यक्ष जगदीश वैद्य, ऍड. शशिर वंजारी, अनिल मानापुरे, प्रा.चंद्रशेखर गिरडे, अभिजित वंजारी, बाळकृष्ण सेलोकर, मोहन बांगळकर, जाधवराव साठवणे, देविदास लांजेवार, ऍड. धनराज खोब्रागडे, प्रेमदास लांजेवार, प्रा. प्रेमराज मोहकार, धनराज साठोने, मंगेश वंजारी, विकास मदनकर, भोलाराम वंजारी, प्रमोद मानापुरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
पालखी मार्गक्रमण होताना समाजबांधवानी ठिकाणी पालखीचे स्वागत केले. यावेळी साई मंदिर समितीकडुन सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संचालन प्रमोद मानापुरे यांनी केले. प्रास्ताविक महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हाध्यक्ष प्रा.चंद्रशेखर गिरडे यांनी केले.
यावेळी माजी आमदार चरण वाघमारे, सुनील चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विखुरलेल्या समाजानी एकत्र यावे व ओबीसी चळवळीत सामिल होऊन अन्यायाविरुद्ध लढा द्यावा अन्यथा ओबीसी ना राजकीय आरक्षण सह शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण सुद्धा घालवावे लागेल असा सूचक इशारा दिला.
कार्यक्रमासाठी पवन मस्के, प्रविण भोंदे, शांतनू भुरे, नरेंद्र साकोरे, पुरुषोत्तम कांबळे, अमित बिसने, अनिल कळंबे, इंद्रजित कुरझेकर, रोशन काटेखाये, मुकुंद साखरकर, गोविंद चरडे, बाळू आंबिलढूके, स्वप्नील भोंगाडे, भिमराव गभने, महिला आघाडीच्या वंदना दंडारे, शरयू देशमुख, किरण राजगिरे, उषा मोहोरकर, शीतल चरडे, साखरकर, दर्शना गिरडे, मंदा कांबळे, रिता वंजारी, सुषमा वंजारी, संगीता वंजारी, ऍड.मंजुशा गायधने, छाया तुरसकर, मेघना पडोळे, कल्पना कुरझेकर, किरण बालपांडे, सोनू मेहर, सुलभा मलेवार, भाग्यश्री भोले, छाया गभने, अंकुश वंजारी, जीवन भजनकर, अश्विन बागळकर, रोशनी धावडे, महेश शहारे, कार्तिक ठोसरे, हेमंत साकुरे, गीतेश ठोंबरे, अविनाश गायधने, गजानन मेहर, हर्षल वंजारी, शरद साकोरे, सुनील किरपाणे, अपर्णा आकरे, आशा गिर्हेपुंजे, किशोर दंडारे, महेश पडोळे, सुरेश बावनकुळे, महेश पडोळे, सुभाष मलेवार यांच्यासह तेली समाजबांधव, भगिनी, युवा मंडळीनी सहकार्य केले.