परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे महाराष्ट्र राज्य किशोरव किशोरी गट राज्य कबड्डी स्पर्धा झाली. या स्पर्धेत पुणे जिल्हा संघाची कर्णधार व निगडी येथील नवनगर ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाची खेळाडू धनश्री तेली हिने अष्टपैलू खेळ करत चौफेर चढाया व उत्कृष्ट पकडी करीत पुणे जिल्हा संघाला उपविजेतेपद मिळवून दिले. तिची २८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२२ दरम्यान उत्तराखंड येथे होणान्या राष्ट्रीय किशोर व किशोरी गटाच्या कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड होऊन तिची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
यावर्षीच्या खेलो इंडिया राज्य कबड्डी स्पर्धांमध्ये देखील ती सहभागी झाली होती. तिला प्रशिक्षक भगवान सोनवणे, स्वाती ढमाले यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य मनोज देवळेकर, पर्यवेक्षक सुधीर कुलकर्णी, व्यवस्थापक विड्या उदास यांनी तिचे अभिनंदन केले.
परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे महाराष्ट्र राज्य किशोर व किशोरी गट राज्य कबड्डी स्पर्धा झाली. या स्पर्धेत धनश्री तेली हिने चांगली कामगिरी केली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade