अहमदनगर : आज प्रत्येक मनुष्य हा आत्मकेंद्री बनत चालला आहे. मी, माझे, मला या मानसिकतेतून जात असतांना समाज, मित्र, परिवार यांना विसरत आहेत. अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकांचा विकास व्हावा, समाजाला दिशा मिळावी, समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी तिळवण तेली समाज ट्रस्ट समाजाचे संघटन करुन समाजोन्नत्तीचे काम करत आहे. समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध उपक्रम राबवू संतश्रेष्ठ संताजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून सुरु असलेल्या कार्यास प्रोत्साहन देण्याचे काम करणे गरजेचे आहे. त्यातून समाज संघटन मजबूत होऊन समाजातील प्रश्न सोडविणे सोपे जाईल, असे प्रतिपादन नारायण उगले यांनी केले.
तिळवण तेली समाज ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नारायण उगले, विनोद राऊत, प्रणव उगले, ट्रस्टचे अध्यक्ष सागर काळे, उपाध्यक्षा निता लोखंडे, सचिव सचिन शेंदूकर, खजिनदार प्रकाश सैंदर, विश्वस्त प्रसाद शिंदे, गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, मनोज क्षीरसागर, शशिकांत देवकर, शोभना धारक आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना ट्रस्टचे अध्यक्ष सागर काळे म्हणाले, तिळवण तेली समाज ट्रस्टच्या माध्यमातून समाजाचे संघटन करुन अडीअडचणी सोडविण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबवून समाजातील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन व आधार देण्याचे काम सुरु आहे. विशेषत: कोरोना काळातही समाज बांधवांच्या सहकार्याने किराणासह विविध मदतरुपी हात देण्याचे काम केले. सर्वांचे सहकार्य मिळत असल्याने आम्हाला काम करण्यास उर्जा मिळत आहे. आजच्या सन्मानामुळे आम्हास प्रोत्साहन मिळून, आणखी जोमाने करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकूळ कोटकर यांनी केले तर आभार मनोज क्षीरसागर यांनी मानले.